सोमवार,१४ जुलै २०२५,आषाढ कृष्णपक्ष,संकष्टी चतुर्थी.
तिथी-चतुर्थी २४|००
रास- कुंभ
नक्षत्र-धनिष्ठा
योग-आयुष्मान
करण-बवकरण
दिनविशेष-शुभ दिवस
मेष - प्रवासाची आपल्याला विशेष आवड आहे. मोठे प्रवास किंवा कामाशी निगडित कोणत्या गावाला जायचं असेल तर त्याला आज प्रथम प्राधान्य द्याल. समाजकारणात आणि राजकारणात यश मिळेल.
वृषभ- तीर्थक्षेत्री भेट देण्याचे योग आहेत. देवाने झोळी मध्ये अनेक चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्याविषयी कृतज्ञता बाळगाल. जोडीदाराबरोबर समजूतदारपणाचे संबंध आज राहतील. नव्या चांगल्या गोष्टी आयुष्यात घडतील.
मिथुन - भ्रष्टाचार, लाचलुचपत या मार्गाने अचानक मोठ्या धनलाभ होण्याची शक्यता आहे. पण काळजी घ्यावी. सरकारी गोष्टींमध्ये अडकण्याचा संभव आहे. महत्त्वाची कामे आज नकोतच. कोठेही साक्षीदार राहू नका.
कर्क - प्रेमाने समोरच्याला आपलेसे करणे हे आपल्या राशीला सहज जमते. आज सगळ्यांशी समजूतदारपणे वागाल. व्यवसायामध्ये नवीन बदल करण्यासाठी तशा बैठका सुद्धा पार पडतील.
सिंह - पाठीच्या मणक्याचे आजार, हृदयाशी निगडित आजार यांचा त्रास संभवतो आहे. तब्येतीची काळजी घ्यावी. आपल्या चांगल्या गोष्टी बघवत नाहीत असे काही गुप्त शत्रू आहेत. त्यांच्यापासून सावध रहा. महत्त्वाच्या गोष्टी शेअर न केलेल्या बऱ्या.
कन्या - बौद्धिक गोष्टी मध्ये प्रगती होईल. नव्याने कोणता अभ्यासक्रम शिकण्यासाठी सुरुवात करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे. विद्यार्थ्यांना यश चांगले यश मिळेल. धनयोग उत्तम. विष्णू उपासना करावी.
तूळ -व्यापारामध्ये मनासारखी प्रगती होईल. शेतीवाडीच्या गोष्टींमध्ये गुंतवणूक किंवा व्यवहार फायदेशीर ठरतील. घरातील मोठ्या लोकांच्या सल्ल्याने वागल्यास प्रगतीपथावर रहाल.
वृश्चिक - बहिण भावंडांचे सहकार्य मिळेल. काही जणांशी अबोला असेल तर आज तो संपुष्टात येईल. ठरवेल ते करेनच असे जिद्द बाळगून पुढे जाल. दिवस आव्हानात्मक आहे.
धनु -पैसा हा आपल्या राशीला महत्त्वाचा आहे. आज तो मिळवण्यासाठी विशेष खटपट कराल. सुवर्ण अलंकार किंवा सोने खरेदीसाठी किंवा अशा गुंतवणुकीसाठी विशेष प्रयत्नशील राहाल. स्नेहभोजनाचे योग आहेत.
मकर -वास्तविक पाहता कोणाच्या आध्यात मध्यात न असणारी आपली रास. थोडीशी अबोल. आज स्वतःसाठीच दिवस खर्च कराल. नवनवीन गोष्टी बघणे, खरेदी करणे आणि लहान गोष्टीत आनंद मिळवत दिवस व्यतीत होईल.
कुंभ - जे आहे ते मान्य करूनच पुढे जावे लागेल. कदाचित वजा गोष्टींमधून अधिक गोष्टी होण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील. याचा विचार अधिक कराल. मनोबल थोडेसे कमी असले तरी उपासनेच्या आधारावर तरुन जाल.
मीन - मित्र-मैत्रिणी यांचा सहवास लाभेल. जुन्या गोष्टी ज्या आपण केलेले आहेत त्यामधून फायदा दिसतो आहे. इतरांना आपला सल्ला मोलाचा वाटेल. दिवस चांगला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.