शिंदे आणि ठाकरेंमध्ये सुरु असलेला निवडणूक चिन्हाचा वाद आता निर्णायक वळणावर पोहचलाय.. तब्बल 2 वर्षांपासून शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा यावर सर्वोच्च न्यायालयात काथ्याकूट सुरु आहे.. मात्र आता न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी न्यायमुर्ती सुर्यकांत यांच्या खंडपीठाने निकाल कधीपर्यंत देणार? याची माहितीच दिलीय...
सुप्रीम कोर्टात काय झालं? (उद्धव ठाकरे+एकनाथ शिंदे+सुप्रीम कोर्ट)
पक्ष, चिन्हाबाबत आजच सुनावणी घ्या, ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांची मागणी
आम्ही ऑगस्टमधील तारीख देण्याचा प्रयत्न करू - न्यायालय
निवडणुका येतायत, आजच सुनावणी घ्या, कपिल सिब्बल यांची विनंती
प्रकरण 2 वर्षांपासून सुरु असल्यानं नव्यानं अर्ज देणं बंद करा-न्यायालय
लवकरच ऑगस्टमध्ये सलग सुनावणीची तारीख देण्यात येईल -न्यायालय
सर्वोच्च न्यायालयाच्या या भुमिकेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधी निकाल लागला तर त्याचा फायदा ठाकरे सेनेला होण्याची शक्यता कायदेतज्ज्ञांकडून व्यक्त केली जातेय.
निवडणूक आयोगाने याआधीच शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे सेनेला दिलय... मात्र त्यानंतर या प्रकरणी आत्तापर्यंत न्यायालयात नेमकं काय घडलंय? पाहूयात...
फेब्रुवारी 2023
निवडणूक आयोगाकडून पक्ष, चिन्ह शिंदेसेनेला
फेब्रुवारी 2023
ठाकरेसेनेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल चिन्ह
23 फेब्रुवारी 2023
आयोगाच्या निर्णयास ठाकरेसेनेकडून न्यायालयात आव्हान
23 फेब्रुवारी 2023
निवडणूक आयोगाच्या निर्णयास स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार
7 मे 2025
तातडीच्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाचा नकार
14 जुलै 2025
पक्ष आणि चिन्ह शिंदेसेनेला देण्याच्या निर्णयावरील आव्हान याचिकेवर सुनावणी
सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय घेण्याचे संकेत दिलेत.. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरेंना धनुष्यबाण मिळणार की मशालच पेटवावी लागणार? हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.