Fact Check: 500 रुपयाच्या नोटा बंद होणार? एटीएममध्ये नोटा न टाकण्याचे बँकांना आदेश? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

RBI Clarifies on ₹500: तुमच्याकडे 500 रुपयांची नोट आहे का...? 500 रुपयांची नोट असेल तर आताच बँकेत जमा करा...कारण एक मेसेज व्हायरल होतोय त्यामध्ये असा दावा करण्यात आलाय की आता 500 रुपयांची नोट बंद होणार आहे...पण, हे खरं आहे...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
Rumors about ₹500 note ban go viral, but RBI confirms no such decision has been made.
Rumors about ₹500 note ban go viral, but RBI confirms no such decision has been made.Saam Tv
Published On

...500 रुपयांची नोट आता बंद होणार असल्याचा दावा करण्यात आलाय...कारण, तसा एक मेसेज व्हायरल होतोय...आरबीआयने थेट आता बँकांनाच एटीएममध्ये 500 रुपयांच्या नोटा टाकू नका असे निर्देश दिल्याचा दावा करण्यात आलाय...हा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय...त्यामुळे सगळेच संभ्रमात पडलेयत...त्याआधी या मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

हा मेसेज व्हायरल होत असल्याने काहींनी 500 रुपयांच्या नोटा खर्चून टाकल्या...तर काहींनी 500 च्या नोटा पुन्हा बँकेत जमा केल्यायत...या मेसेजमुळे संभ्रम निर्माण झाला असून, खरंच 500 च्या नोटा बंद होणार आहेत का...? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली...याबाबत आरबीआयकडूनच अधिक माहिती जाणून घेतली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

500 रुपयांची नोट बंद होणार हा दावा खोटा

500 रुपयांच्या नोटा चलनात कायम राहणार

नोट बंद होणार या अफवांवर विश्वास ठेवू नका

500 ची नोट बंद होणार याबाबत रिझर्व्ह बँकेकडून कोणतेही अधिकृत निवेदन याबाबात जारी करण्यात आलेले नाही...त्यामुळे अशा फसव्या मेसेजेस पासून लोकांनी सावध राहावे...आमच्या पडताळणीत 500 रुपयांची नोट बंद होणार असल्याचा दावा असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com