
‘क्रिकेटची पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागलाय. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने भारताचा पराभव करत 2-1 अशी विजयी आघाडी घेतलीय. भारताल पराभव जरी स्वीकारावा लागला असला तरी या कसोटी सामन्यात रवींद्र जडेजानं मोठा विक्रम केलाय. रवींद्र जडेजानं र्धशतक झळकावून विक्रमाला गवसणी घातलीय.
पाचव्या दिवशी पहिल्या तासाभराच्या खेळात भारताने रिषभ पंत, लोकेश राहुल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या विकेट्स गेल्या. त्यानंतर रवींद्र जडेजा आणि नितीश कुमार यांनी चांगली खेळी केली दोघांनी ९१ चेंडूंत ३० धावा केल्या. ख्रिस वोक्सने मात्र ही भागीदारी मोठी होऊ दिली नाही. त्यानंतर भारत लवकरच आपला डाव आटोपणार असं वाटत होतं. पण रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांनी खिंड लढवली आणि दोघांनी इंग्लंडचा विजय कठिण केलं, पण शेवटी भारताच्या वाट्याला पराभव आला.
रवींद्र जडेजाने अर्धशतक झळकावताना अनेक विक्रमांना गवसणी घातली. लॉर्ड्स कसोटीत ६ ते ११ क्रमांकाच्या फलंदाजांमध्ये दोन अर्धशतक झळकावणारा तो पहिला भारतीय ठरलाय. यापूर्वी न्यूझीलंडच्या विक पोलार्ड यांनी १९६५ साली ५५ व ५५ अशी अर्धशतके केली आहेत. त्याआधी १९८४ मध्ये श्रीलंकेच्या दुलीप मेंडिस यांनी १११ व ९४, वेस्ट इंडिजच्या जेफ डुजॉन यांनी १९८८ मध्ये ५३ व ५२ आणि १९८८मध्ये विंडीजच्या गस लॉगीने ८१ व नाबाद ९५ अशा धावा करत दोन अर्धशतकं करण्याचा विक्रम केला होता.
लक्ष्याचा पाठलाग करताना, भारतीय संघाची दुसऱ्या डावात सुरुवात खूपच खराब झाली. डावाच्या दुसऱ्याच षटकात यशस्वी जैस्वालची विकेट गेली. त्यानंतर खेळाच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाने करुण नायर (१४ धावा), कर्णधार शुभमन गिल (६ धावा) आणि नाईटवॉचमन आकाश दीप (१ धावांवर बाद झाला.
अखेरच्या दिवशी भारताने चार विकेटवर ५८ धावांवर खेळण्यास सुरुवात केली. सहा विकेट शिल्लक होत्या. त्यावेळी राहुल क्रीजवर होता. सुरुवातीच्या सत्रात भारताने ऋषभ पंत, केएल राहुल यांचे विकेट गमावल्या होत्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.