Budh Gochar  saam tv
राशिभविष्य

Budh Gochar: बुध करणार सूर्याच्या नक्षत्रात गोचर, एका रात्रीत या ३ राशींचं नशीब फळफळणार

१३ मे रोजी बुध कृत्तिका नक्षत्रातून गोचर करत असून वृषभ, मिथुन आणि सिंह राशीसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे. करिअर, आर्थिक लाभ आणि नवीन संधी मिळण्याचे संकेत ज्योतिषशास्त्रानुसार दिले गेले आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रानुसार, बुधाच्या गोचराचा बुद्धिमत्ता, व्यवसाय, संवाद आणि निर्णयक्षमतेवर परिणाम होतो आणि म्हणूनच ते महत्त्वपूर्ण मानलं जातं. ज्यावेळी बुध सूर्याच्या अधिपत्याखालील कृत्तिका नक्षत्रातून गोचर करतो त्यावेळी व्यक्तीचा आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि स्पष्ट विचारशक्ती वाढते.

वैदिक पंचांगानुसार, ग्रहांचा अधिपती असलेला बुध १३ मे रोजी कृत्तिका नक्षत्रातून गोचर करणार आहे. यामुळे काही राशींच्या व्यक्तींना चांगले यश मिळू शकणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

वृषभ

बुध ग्रहाचे कृत्तिका नक्षत्रातील भ्रमण वृषभ राशीसाठी शुभ संकेत आहे. तुमची आर्थिक परिस्थिती झपाट्याने सुधारू शकणार आहे. नवीन व्यावसायिक करारांमधून नफा मिळणार आहे. लोक तुमचे म्हणणं गांभीर्याने ऐकू शकणार आहेत. कुटुंबात आनंद आणि सहकार्य राहील.

मिथुन

बुध ग्रहाचं कृत्तिका नक्षत्रातून होणारं भ्रमण मिथुन राशीसाठी नवीन संधी निर्माण करू शकणार आहे. नवीन ओळखींमुळे व्यवसायात फायदा होणार आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी बढती किंवा नवीन भूमिका मिळू शकणार आहे. या काळात तुमची निर्णयक्षमता सुधारणार आहे. तुम्हाला कुटुंब आणि मित्रांकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.

सिंह

बुध ग्रहाच्या नक्षत्र गोचरमुळे करिअरमध्ये अचानक प्रगती होण्याची शक्यता आहे. तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात, ज्यामुळे भविष्यात यश मिळणार आहे. पैसे कमावण्याच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामं पूर्ण होणार आहेत.

Disclaimer : राशीभविष्य ज्योतिषशास्त्राच्या आधारे तयार करण्यात आलं आहे. या माहितीवर आधारित घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO WhatsApp Channel: WhatsApp वर करा एक क्लिक अन् मिळवा PF ची संपूर्ण माहिती; वाचा प्रोसेस

Maharashtra News Live Update: शिरूरच्या निमगाव भोगीत बिबट्याचा धुमाकूळ

Mumbai Metro : मेट्रोचा मोठा निर्णय! मुंबईत २० ऑक्टोबरपर्यंत रात्री उशीरापर्यंत मेट्रो धावणार, मुंबईकरांना दिलासा

Blood pressure monitoring: ब्लड प्रेशर नेमका कधी चेक करावा? दिवसभरातील 'हा' टाइम सर्वात बेस्ट

Kitchen Hacks : मिक्सर, मसाले अन् डब्यांचा पसारा? 'या' ३ ट्रिक्सने किचन दिसेल चकाचक

SCROLL FOR NEXT