Bhadra-Budhaditya  saam tv
राशिभविष्य

Budhaditya-Bhadra Rajyog: बुद्धी दाता बुध ग्रह बनवणार डबल राजयोग; 'या' राशींच्या हाती येणार पैसाच पैसा

Budhaditya And Bhadra Mahapurusha Rajyog 2025: बुध जूनच्या मध्यात सूर्याशी युती करून बुधादित्य राजयोगही तयार करणार आहे. बुधाच्या डबल राजयोगाचा 12 पैकी या 3 राशींना फायदा मिळणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध हा तर्कशास्त्र, शिक्षण, ज्ञान, व्यवसाय, बुद्धिमत्ता यांचा कारक आहे. त्यामुळे बुधाच्या स्थितीतील बदलाचा परिणाम या गोष्टींवर होत असतो. बुध राशीत सुमारे १५ दिवस राहतो. आज 6 जून रोजी बुधाने मिथुन राशीत प्रवेश केला आहे. या राशीत येताच भद्रा महापुरुषाने राजयोगाची निर्मिती केली आहे.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा युवराज बुध 6 जून रोजी सकाळी 9 वाजून 29 मिनिटांनी मिथुन राशीत प्रवेश केला आहे. बुध 22 जूनपर्यंत या राशीत राहील. अशा परिस्थितीत भद्र राजयोग २२ जूनपर्यंत राहणार आहे. ग्रहांचा राजा सूर्य 15 जून रोजी मिथुन राशीत प्रवेश करणार असून तो बुधाशी युती करून बुधादित्य योग तयार करणार आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ मिळेल ते पाहूयात.

सिंह रास

या राशीच्या लोकांसाठी दुहेरी राजयोग लकी ठरणार आहे. या राशीच्या लोकांना जबरदस्त फायदा होऊ शकणार आहे. शेअर बाजाराच्या माध्यमातून ही तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. आवडीने अनेक प्रलंबित कामं पूर्ण करू शकता. निर्णय घेण्याची क्षमता वाढू शकते.

धनु रास

धनु राशीच्या व्यक्तींसाठी भद्र आणि बुधादित्य योग भाग्यशाली ठरू शकणार आहे. बुध या राशीच्या सातव्या भावात आहे. यावेळी ऐश्वर्य आणि मान-सन्मानात झपाट्याने वाढ होणार आहे. व्यवसाय क्षेत्रातही लाभ मिळण्याची शक्यता आहे. तर्कशक्ती वाढू शकते आणि बौद्धिक क्षमताही चांगली राहील.

कुंभ रास

ग्रहांचा राजकुमार बुधाने निर्माण केलेला बुधादित्य आणि भद्र महापुरुष राजयोग या राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरू शकतो. एकाग्रता वाढल्याने स्मरणशक्ती वाढू शकणार आहे. कलाक्षेत्राशी संबंधित व्यक्तींनाही बरेच फायदे मिळू शकतात. अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव मिळू शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT