Guru Budh Yuti saam tv
राशिभविष्य

Budh-Guru Yuti: 12 वर्षांनी बनणार बुध-गुरुची महायुती; 3 राशींच्या आयुष्यात पडणार पैशांचा पाऊस

Conjunction Of Budh And Guru 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुध आणि गुरु ग्रहांची येत्या काळात युती होणार आहे. या दोन ग्रहांच्या युतीमुळे काही राशींवर याचा चांगला परिणाम होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे अनेकदा एका राशीमध्ये दोन ग्रहांची युती होते. या दोन ग्रहांच्या युतीचा परिणाम काही राशींवर चांगला तर काही राशींवर विपरीत होऊ शकतो.

गुरु ग्रह सुमारे १२ वर्षांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतो. गुरू मे महिन्यात मिथुन राशीत प्रवेश केला आहे आणि ६ जून रोजी बुधाशी युती करणार आहे. कारण ६ जून रोजी बुध स्वतःच्या राशी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. अशा परिस्थितीत, या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. या काळात संपत्तीत प्रचंड वाढ होऊ शकणार आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ मिळेल ते पाहूयात.

मिथुन रास

गुरु आणि बुध ग्रहाची युती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. ही युती तुमच्या राशीपासून सुरुवातीला तयार होणार आहे. या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहणार आहे. हा काळ आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही दिलासा देणारा असणार आहे. जुने आजार बरे होऊ शकतात.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी गुरु आणि बुध यांचा युती सकारात्मक ठरू शकणार आहे. यावेळी तुम्हाला काम आणि व्यवसायात विशेष प्रगती मिळू शकणार आहे. नोकरीत पदोन्नती किंवा पगारवाढ शक्य आहे. तुमच्या वडिलांशी तुमचे संबंध चांगले राहणार आहेत. या काळात, तुमच्या वडिलांशी तुमचे संबंध चांगले राहतील.

वृषभ रास

गुरु आणि बुध यांचा युती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. ही युती तुमच्या राशीच्या धन आणि वाणी स्थानात होणार आहे. तुमच्या वाणीचा प्रभाव वाढणार आहे. तुमचं व्यक्तिमत्व सुधारण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली होणार असून अडकलेले पैसे परत मिळू शकतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

SCROLL FOR NEXT