Panchak Yog: 3 जूनपासून 3 राशींच्या आयुष्यात येणार अडथळे; पंचक योगामुळे प्रत्येक निर्णय घ्यावा लागणार विचारपूर्वक

Surya Shani Yuti Effects on Zodiac Sign: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि शनि पंचक योग तयार करणार आहेत. ज्यामुळे काही राशींच्या समस्या वाढू शकणार आहेत. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.
Dwadash Rajyog
Dwadash Rajyogsaam tv
Published On

वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि ग्रहाला कर्मांचा न्यायाधीश मानण्यात येतं. नव ग्रहांमध्ये शनी हा सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह आहे. हा ग्रह जातकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. ज्योतिषशास्त्रानुसार, शनि एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो आणि २०२७ पर्यंत मीन राशीत राहील.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, येत्या काळात शनि आणि सूर्यामध्ये ७२ अंशांचा कोन तयार होणर आहे. ज्याला पंचक योग म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार, हा योग ३ जून रोजी पहाटे ३:३१ वाजता तयार होणार आहे. यावेळी शनि आणि सूर्य यांच्यामध्ये हा योग तयार होणार असून हा विशेष योग काही राशींसाठी अशुभ संकेत ठरू शकतो. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

Dwadash Rajyog
Budh Gochar : ६ जूनपासून या ३ राशींना लागणार लॉटरी; बुध ग्रह मिळवून देणार पैसा

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांनी यावेळी सावधगिरी बाळगली पाहिजे. तुम्हाला कामात आणि कौटुंबिक जीवनात काही समस्या येऊ शकतात. तुमचे वर्तन थोडं असभ्य असू शकणार आहे. तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावं लागू शकतं. तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करावा लागणार आहे. धोकादायक गुंतवणूक तुम्हाला टाळावी लागणार आहे. अन्यथा तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. या काळात तुमचे विचार इतरांवर लादण्याची प्रवृत्ती नुकसान पोहोचवू शकते. तुमच्या गुप्त योजना उघड करू नका.

Dwadash Rajyog
Shani Dev: शनीदेवाच्या या ३ राशी आहेत सर्वात प्रिय; व्यक्तींच्या सर्व इच्छा होतात पूर्ण

कुंभ रास

पंचक योगाच्या प्रभावामुळे कुंभ राशीच्या लोकांना राग आणि घाई टाळावी लागणार आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी थंड डोक्याने विचार करा. सट्टेबाजी किंवा शेअर्ससारख्या धोकादायक गुंतवणुकीपासून दूर रहावं लागेल. कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे.

Dwadash Rajyog
Shani Dev Vakri: 500 वर्षांनंतर गुरुचा उदय आणि शनी होणार वक्री; 3 राशींचे येणार सोन्यासारखे दिवस

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com