TODAY HOROSCOPE  Saam tv
राशिभविष्य

Tuesday Horoscope : प्रेमाने नाती जोडा, ५ राशींच्या व्यक्तीची होणार चांदीच चांदी; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Today Rashi Bhavisha : १२ राशींच्या व्यक्तींना मंगळवारी मिळेल का आश्चर्याचा धक्का? जाणून घेण्यासाठी वाचा संपूर्ण राशीभविष्य.

Sakshi Sunil Jadhav

मेष : आज सर्वांचे सहकार्य आणि विश्वास मिळेल. कामात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. मित्र आणि सहकाऱ्यांसोबतचे संबंध अधिक मजबूत होतील.

वृषभ : व्यवसायात सावधपणे निर्णय घ्या. कोणत्याही कामात घाई किंवा दिखावा टाळा. वेळेचे योग्य नियोजन केल्यास फायदा होईल.

मिथुन : करिअर आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. महत्त्वाच्या चर्चांमध्ये यश मिळू शकते. कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल.

कर्क : आर्थिक कामांना चांगली गती मिळेल. घरातील सदस्यांशी प्रेमाने आणि आदराने वागा. आवश्यक खरेदी करण्याचा योग आहे.

सिंह : सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. व्यवसाय वाढवण्याच्या नवीन संधी मिळतील. आत्मविश्वासाने काम केल्यास चांगला लाभ होईल.

कन्या : घरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण राहील. एखादा महत्त्वाचा प्रस्ताव मिळू शकतो. कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवाल.

तुळ : नवीन कल्पनांना चांगला प्रतिसाद मिळेल. करिअर आणि व्यवसायात प्रगती होईल. नियोजन करून काम केल्यास यश मिळेल.

वृश्चिक : पैशांच्या व्यवहारात काळजी घ्या. कायदेशीर प्रकरणांमध्ये संयम ठेवा. अनावश्यक धोका घेणे टाळा.

धनु : आर्थिकदृष्ट्या दिवस लाभदायक राहील. कामाच्या ठिकाणी मान आणि जबाबदारी वाढेल. मित्रांचे सहकार्य लाभेल.

मकर : वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळेल. कामात नवीन संधी मिळतील. मेहनतीमुळे उद्दिष्टे पूर्ण होतील.

कुंभ : नशीब तुमच्या बाजूने राहील. पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. नियोजनबद्ध कामातून चांगला लाभ मिळेल.

मीन : दिवस संमिश्र स्वरूपाचा राहील. बोलताना संयम आणि समजूतदारपणा ठेवा. आरोग्य आणि खर्चाकडे विशेष लक्ष द्या.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पावसामुळे रत्नागिरीत उडाली भातशेतीची दाणादाण, शेतकऱ्याचं मोठं नुकसान

Mumbai Pollution: मुंबईतील प्रदूषणाला MMRDA चे प्रकल्प जबाबदार? उच्च न्यायालयाच्या समितीने व्यक्त केली नाराजी, तातडीने कारवाईचे आदेश

Maharashtra Politics: शरद पवारांना मोठा धक्का! शहराध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा राजीनामा; 'या' पक्षात केला प्रवेश

Metro 5 : ठाणे, भिवंडी आणि कल्याणकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो ५ च्या विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा

MSEDCL Smart Meter : स्मार्ट मीटर बसवा, नाहीतर लाईट बंद; महावितरणकडून २४ तासांचा अल्टिमेटम

SCROLL FOR NEXT