Sakshi Sunil Jadhav
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे झोपायला पुरेशी वेळ मिळत. उलट कामामुळे किंवा जास्त स्क्रीन टाईममुळे झोप कमी होते.
पुरेशी झोप झाली नाही की, चिडचिड, तणाव, चिंता, मूड स्विंग आणि डिप्रेशनचा धोका वाढतो.
जर तुम्ही नेहमी उशीरा झोपत असाल तर स्मरणशक्ती, एकाग्रता आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी होऊ शकते.
उशीरा झोपल्यावर हार्मोन्समध्ये बदल होतो आणि रात्री बाहेरचे चटकदार पदार्थ खाण्याची इच्छा वाढते.
रात्रीत झोपेत त्वचा Recover होते. पण उशिरा झोपल्यावर डार्क सर्कल्स, निस्तेज त्वचा, सुरकुत्या आणि मुरुम येण्याची समस्या वाढू शकते.
झोपेच्या कमतरतेमुळे शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे सतत संसर्ग होण्याचा धोका वाढतो.
उशिरा झोपणे आणि रात्री उशिरा खाण्यामुळे गॅस, अपचन, पोट आणि चयापचय मंदावण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
ही माहिती सर्वसाधारण आरोग्य जनजागृतीसाठी आहे. झोपेच्या गंभीर समस्या, सततचा थकवा किंवा इतर आरोग्यविषयक त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. साम टिव्ही याच्याशी समर्थन करत नाही.