Does a smart meter increase electricity bills : स्मार्ट मीटर बसवण्यास परवानगी द्या, नाहीतर वीज बंद करण्यात येईल, असा इशारा महावितरणाने डोंबिवलीतील सोसायट्यांना दिला आहे. याबाबतची कचक नोटीस पाटवण्यता आली असून २४ तासांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने ( MSEDCL ) डोंबिवलीच्या एमआयडीसी निवासी भागातील दोन गृहनिर्माण सोसायट्यांना स्मार्ट मीटर बसवण्यासाठी प्रवेश न दिल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची धमकी देणारी नोटीस बजावली आहे. या नोटिसांमुळे रहिवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यांनी मीटर बसवण्याच्या मोहिमेला विरोध केला आहे. (Smart Meter Installation, MSEDCL Power Cut Notice)
मिळालेल्या माहितीनुसार महावितरणने (MSEDCL) डोंबिवली एमआयडीसी परिसरातील अनेक हाऊसिंग सोसायटींना एक अत्यंत कडक नोटीस पाठवली आहे. जुने मीटर बदलून तिथे नवीन 'स्मार्ट मीटर' बसवण्यास २४ तासांत परवानगी द्या, अन्यथा वीज पुरवठा खंडित केला जाईल, असा थेट इशारा महावितरणने दिला आहे.
स्थानिकांचा विरोध कशामुळे?
गेल्या ६ ते ७ महिन्यांपासून येथील रहिवासी स्मार्ट मीटर बसवण्यास तीव्र विरोध करत आहेत. नवीन स्मार्ट मीटरमुळे लाईटबिल वाढेल, अशी स्थानिकांना भीती वाटत आहे. महावितरण किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांना मीटर रूममध्ये प्रवेशच मिळू नये, म्हणून अनेक सोसायट्यांनी आपल्या मीटर रूमला कुलूपे लावून ठेवली आहेत. त्यामुळे आता महावितरणकडून सोसायट्यांना थेट इशारा दिला जात आहे.
स्मार्ट मीटर बसवणे सक्तीचे नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तरीही महावितरणचे अधिकारी आमच्यावर सक्ती करत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. तसेच, विचार न करता अधिकारी परस्पर मीटर बदलत असल्याचा दावाही स्थानिकांनी केला आहे.
महावितरणची भूमिका
दुसरीकडे, महावितरणचे म्हणणे आहे की, स्मार्ट मीटरमुळे वीज वापराची अचूक नोंद होईल आणि बिले वाढणार नाहीत. जे लोक बेकायदेशीरपणे वीज वापरतात, तेच या स्मार्ट मीटरला विरोध करत असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. कल्याणातील ३ लाख ९१ हजार ग्राहकांपैकी १ लाख ८१ हजारहून अधिक ग्राहकांकडे आतापर्यंत स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत.
नेमकं प्रकरण काय आहे?
साईदीप आणि इंद्रनील सोसायट्यांना नोटिसा बजावण्यात आल्या. या सोसायट्यांमध्ये ८० निवासी फ्लॅट्स आहेत. रहिवाशांनी त्यांचे वीज मीटर बॉक्स बंद केल्यामुळे, एमएसईडीसीएलचे अधिकारी आणि त्यांचे खाजगी कंत्राटदार यांना बदलीसाठी विद्यमान मीटर्सपर्यंत पोहोचता येत नव्हते. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रनील सोसायटीचे अध्यक्ष अमेय पारकर कामावर बाहेर असल्याने, एमएसईडीसीएलचे अधिकारी आणि कंत्राटदारांनी शुक्रवारी दुपारी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांना नोटीस सुपूर्द केली.
विद्युत कायदा, २००३ चे कलम ५५ आणि १६३ आणि केंद्रीय विद्युत प्राधिकरणाचे (CEA) मीटर स्थापना आणि संचालन सुधारणा नियम यांचा संदर्भ देण्यात आला आहे. विद्युत कायद्याचे दाखले देत, ग्राहक स्मार्ट मीटर बसवण्यास नकार देऊ शकत नाहीत आणि २४ तासांत सहकार्य न केल्यास वीज कापावी लागेल, असा इशारा या पत्रात दिला आहे. महावितरणच्या या कारवाईमुळे रहिवाशांमध्ये संताप पसरला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.