Gajkesari Yog saam tv
राशिभविष्य

Guru Chandra Yuti: अवघ्या काही तासांनंतर 'या' राशींचं नशीब उजळणार; प्रत्येक कामात यशासह तिजोरीही पैशांनी भरणार

Jupiter And Moon Conjunction 2024: चंद्र वृषभ राशीत प्रवेश करणार आहे . मुळात या ठिकाणी गुरु आधीच उपस्थित असल्याने गजकेसरी राजयोग तयार होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

एका ठराविक काळानंतर प्रत्येक ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात, असं ज्योतिष्य शास्त्रामध्ये म्हटलं गेलंय. सध्या वर्ष 2024 चा शेवटचा महिना डिसेंबर असून या महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांची राशी बदलली आहे. आज चंद्र वृषभ राशीत प्रवेश करणार आहे . मुळात या ठिकाणी गुरु आधीच उपस्थित असल्याने गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. गुरु चंद्राच्या युतीने गजकेसरी नावाचा राजयोग तयार झाला आहे.

13 डिसेंबर 2024 रोजी म्हणजेच आज दुपारी दुपारी 1:18 वाजता चंद्र वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. गुरु या राशीत उपस्थित असल्याने गजकेसरी राजयोग निर्माण होईल. या राजयोगाच्या निर्मितीमुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना अधिक लाभ होणार आहे ते पाहूयात.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग भाग्यवान सिद्ध होणार आहे. या काळात वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या आवडीचे काम मिळू शकणार आहे. व्यवसायात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ घालवणार आहात. यावेळी तुम्हाला अडकलेले पैसेही परत मिळू शकणार आहेत. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांना गजकेसरी राजयोगामुळे प्रत्येक कामात यश मिळणार आहे. तुम्हाला पालक आणि शिक्षकांचे पूर्ण सहकार्य मिळू शकणार आहे. तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बोनस मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येणार आहेत. यावेळी प्रगतीसोबतच काही नवीन काम सुरू करा.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी गुरू आणि चंद्राचा संयोगही खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. करिअरमध्ये यश आणि व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंद वाढणार आहे. तुमचा जोडीदार आणि मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकणार आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तब्येतही सुधारू शकणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

SCROLL FOR NEXT