Surya Shani Yuti: नव्या वर्षात २ शत्रू ग्रहांची होणार युती; 'या' राशींच्या आयुष्यात येणार अडथळे, नातं तुटण्याचीही शक्यता

Surya Shani Yuti 2025: 2025 च्या सुरुवातीला सूर्य आणि शनीच्या युतीमुळे काही राशीच्या लोकांना नुकसान होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे.
Surya Shani Yuti
Surya Shani Yutisaam tv
Published On

नवीन वर्ष सुरु होणार असून ज्योतिष्य शास्त्राच्या हिशोबाने नवं वर्ष अत्यंत खास मानलं जातंय. नव्या वर्षामध्ये अनेक मोठे ग्रह त्यांच्या राशीत बदल करणार आहेत. ग्रहांच्या या राशी बदलाचा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर विशेष परिणाम होणार आहे. 2025 च्या सुरुवातीला सूर्य आणि शनि या दोन मोठ्या ग्रहांचा संयोग होणार आहे.

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, सूर्य आणि शनीचा संयोग कुंभ राशीत होणार असून शनिदेव हे कर्म आणि न्यायाचा कारक मानला जातो. हे दोघं पिता आणि पुत्र असूनही एकमेकांचे शत्रू मानले जातात. अशा परिस्थितीत 2025 च्या सुरुवातीला सूर्य आणि शनीच्या युतीमुळे काही राशीच्या लोकांना नुकसान होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना नकारात्मक परिणामांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.

Surya Shani Yuti
Shash Mahapurush Rajyog: ३० वर्षांनंतर शनीने बनवला शश महापुरुष राजयोग; 'या' राशींना लागणार जॅकपॉट

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि शनीचा योग संमिश्र परिणाम देणार आहे. या काळात मिथुन राशीच्या लोकांनी सहकाऱ्यांपासून सावध राहावं लागणार आहे. घरातही मोठे वाद होऊ शकतात. या काळात तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. लव्ह लाईफमध्येही काही अडचणी येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुमचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे.

Surya Shani Yuti
२०२५ मध्ये शनीमुळे 'या' राशींच्या अडचणीत होणार वाढ; आर्थिक फटका बसण्याची शक्यता

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांनाही या संयोगात काळजी घ्यावी लागणार आहे. अनावश्यक राग आणि तणाव टाळावं लागणार आहे. यावेळी तुम्ही कोणत्याही वादापासून दूर राहाणं तुमच्या फायद्याचं आहे. व्यवसायात तुम्हाला मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अडचणी निर्माण होऊ शकतात.

Surya Shani Yuti
Malavya Rajyog: 2025 मध्ये शुक्र ग्रह बनवणार मालव्य राजयोग; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार नुसता पैसा

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांना त्यांच्या प्रेम जीवनात आणि वैवाहिक जीवनात अडचणी येण्याची शक्यता आहे. या काळामध्ये व्यवसायात अडचणी येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी होणारा बदल तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. वडिलांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. कोर्टाच्या प्रकरणांमध्ये यश मिळण्याची शक्यता कमी आहे.

Surya Shani Yuti
Gajkesari Yog 2024: १३ डिसेंबरला गुरु-चंद्राच्या युतीने बनणार गजकेसरी योग; 'या' राशींच्या व्यक्तींवर बरसणार पैसा

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com