Surabhi Jayashree Jagdish
नवीन वर्ष 2025 सुरू होणार असून या वर्षी शनिदेव कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहे. शनीचे हे गोचर २९ मार्च रोजी होणार आहे.
2025 मध्ये शनीचा मीन राशीत प्रवेश होताच ते शनी देव चांदीच्या पावलाने भ्रमण करणार आहेत. शनीची उपस्थिती काही राशींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ राहील.
2025 मध्ये ज्यावेळी शनी चांदीच्या पायानी भ्रमण करतील तेव्हा काही राशीच्या अडचणी वाढणार आहेत.
कन्या राशीच्या लोकांना शनी चांदीच्या चरणात पोहोचण्याने नुकसान होऊ शकते. पैसा, करिअर आणि आरोग्य या आघाडीवर सावध राहावं लागणार आहे.
त्याचप्रमाणे या लोकांचे वैवाहिक जीवन देखील खराब होऊ शकते. जोडीदाराशी मतभेद झाल्यामुळे घरातील वातावरण खराब राहू शकते.
शनीचा चांदीचा पायही तूळ राशीच्या लोकांसाठी शुभ नसेल. तूळ राशीच्या लोकांना आर्थिक नुकसान होऊ शकते.
त्याचप्रमाणे या राशीच्या लोकांनाही मुलांची काळजी घ्यावी लागणार आहे. मुलांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ शकतो.