Guru Gochar 2025 Jupiter Planet saam tv
राशिभविष्य

Guru Gochar: १२ वर्षांनंतर गुरु कर्क राशीत करणार प्रवेश; 'या' राशींना मिळणार पद, सन्मान आणि पैसा

Guru Gochar 2025: यंदाच्या वर्षी गुरु ग्रह एकाच वर्षात दोन वेळा गोचर करणार आहे. यावर्षी गुरु दुप्पट वेगाने फिरणार आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ मिळेल ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये ग्रहांचा गुरु बृहस्पतिचा देखील समावेश आहे. गुरु ग्रहाच्या गोचरमुळे सर्व राशींवर त्याचा परिणाम होतो. देवांचा गुरु बृहस्पति ग्रहाला राशी बदलण्यासाठी सुमारे १ वर्ष लागतो. अशा परिस्थितीत, एका राशीत पुन्हा येण्यासाठी सुमारे १२ वर्षे लागतात.

२०२५ मध्ये म्हणजे याच वर्षी गुरु ग्रह दुप्पट वेगाने भ्रमण करणार आहे. अशा परिस्थितीत, तो एका वर्षात २ राशींमध्ये प्रवेश करणार आहे. या वर्षी गुरू मिथुन राशीत प्रवेश करणार आहे आणि नंतर ऑक्टोबर महिन्यात तो त्याच्या उच्च राशी कर्क राशीत गोचर करणार आहे. गुरु कर्क राशीत प्रवेश करत असल्याने काही राशींचं जीवन सुकर होणार आहे.

कन्या रास

या राशीच्या लोकांसाठी गुरूचा कर्क राशीत प्रवेश थोडा फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रह त्याच्या उच्च राशीत गेल्यामुळे बराच काळ थांबलेलं काम पुन्हा सुरू होऊ शकतं. नवीन नोकरी शोधणाऱ्या लोकांनाही बरेच फायदे मिळू शकतात. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. या काळात गुंतवणूक केल्याने तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो.

मेष रास

कर्क राशीत प्रवेश केल्यानंतर गुरु या राशीच्या चौथ्या घरात राहणार आहे. जर कोणतंही काम बऱ्याच काळापासून अडचणीत असेल तर ते आता पूर्ण होऊ शकतं. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमच्या कार्यक्षमतेत आणि गुणवत्तेत वाढ होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या करिअर क्षेत्रात मोठे फायदे मिळू शकतात.

धनु रास

या राशीचा स्वामी असण्याव्यतिरिक्त तो तुमच्या चौथ्या घराचा म्हणजेच तुमच्या आनंदाच्या घराचा स्वामी आहे. तुमचा कल अध्यात्माकडे जास्त असू शकणार आहे. करिअरच्या क्षेत्रात तुम्ही प्रचंड यश मिळवू शकता. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Update: नव्या कर्मचाऱ्यांना मिळणार ₹15,000! हप्ता मिळवण्यासाठी लगेच करा हे काम

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीला

Marriage Line in Palmistry: लग्न कधी होणार, कसा मिळेल पार्टनर? हातावरील ही रेषा देते महत्त्वाचे संकेत!

डायबिटिस पेशंटसाठी 10 नैसर्गिक उपाय, हे पदार्थ खा ब्लड शुगर राहील कंट्रोलमध्ये

Accident News : देवीच्या मंदिराबाहेर भयंकर घडलं! भरधाव कारची भाविकांना धडक; ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT