Ardha Kendra Yog: २ दिवसांनी 'या' राशींचं भाग्य उजळणार, सूर्य-शनी बनवणार अर्धकेंद्र योग

Surya Shani Ardha Kendra Yog: मे महिना ग्रहांच्या बदलासाठी महत्त्वाचा मानला जातोय. २ दिवसांनी सूर्य आणि शनी एक खास योग तयार करणार आहेत. यामुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे ते पाहूयात.
Ardha Kendra Yog
Ardha Kendra Yogsaam tv
Published On

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार एका ठराविक काळानंतर ग्रह विशिष्ट आपली राशी बदलतो. यावेळी या राशी बदलाचा परिणाम सर्व राशींच्या जीवनावर होतो. न्यायधीश शनि मीन राशीत आहे आणि ग्रहांचा राजा सूर्य त्याच्या उच्च राशी मेष राशीत आहे. पिता आणि पुत्र म्हणून ओळखले जाणारे सूर्य आणि शनि लवकरच अर्धकेंद्र योग तयार करणार आहेत. या योगाचा परिणाम कोणत्या राशींवर होणार आहे ते पाहूयात.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ३ मे रोजी सकाळी १०:४५ वाजता सूर्य आणि शनि एकमेकांपासून ४५ अंशांवर असणार आहे. दोन्ही ग्रहांच्या या स्थितीमुळे अर्धकेंद्र योग निर्माण होणार आहे. या योगाच्या निर्मितीमुळे या तिन्ही राशींना भरपूर लाभ मिळू शकणार आहे. यामध्ये कोणत्या राशींना पैसा मिळणार आहे ते पाहूयात.

Ardha Kendra Yog
Grah Gochar: गुरु, शनि आणि राहू-केतू मिळून 'या' राशींचं नशीब चमकवणार; बक्कळ पैसा मिळून उत्पन्नात होणार वाढ

वृषभ रास

या राशीच्या लोकांसाठी अर्धकेंद्र योग लकी ठरू शकतो. तुम्हाला परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. या काळात उत्पन्नात झपाट्याने वाढ दिसून येणार आहे. प्रभावशाली लोकांशी संबंध निर्माण करणं फायद्याचं ठरेल. कुटुंबातील व्यक्तींशी चांगले संबंध असू शकतात. व्यवसायात तुम्हाला चांगले पैसे मिळतील.

मीन रास

या राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि शनीचा अर्धकेंद्र योग पैसे मिळवून देणार आहे. या काळात तुम्ही सकारात्मक विचार करा. कोणत्याही अडचणीत वडीलधारी लोक तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. तुमच्या कामात तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळू शकतं.

Ardha Kendra Yog
Navpancham Rajyog : 18 मे रोजी बनणार शक्तीशाली नवपंचम राजयोग; राहू-गुरु 'या' राशींवर राहणार मेहेरबान

वृश्चिक रास

या राशीच्या लोकांसाठी हा योग लाभ देणारा ठरेल. तुमची परिस्थिती सुधारू शकते. आत्मचिंतनासाठी ही वेळ अगदी सर्वोत्तम ठरू शकतो. पार्टनरसोबत तुमचं नातं अधिक घट्ट होऊ शकतं. जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या काळात ते करणं भाग्यवान ठरू शकतं.

Ardha Kendra Yog
Akshaya Tritiya : अक्षय तृतीयेला २ बनणार राजयोग! वृषभ, धनु आणि कुंभ राशींवर बरसणार पैसा

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com