horoscope  Saam tv
राशिभविष्य

Horoscope Sunday : बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडमध्ये विनाकारण वाद होणार; या राशींच्या लोकांचे मनोबल कमी होणार,वाचा रविवारचं राशीभविष्य

Horoscope Sunday in Marathi : काही राशींच्या लोकांचं मनोबल कमी होणार आहे. तर काहींचं नातं तुटण्याची शक्यता आहे. वाचा रविवारचं राशीभविष्य एका क्लिकवर

Anjali Potdar

आजचे पंचांग

रविवार,३ ऑगस्ट २०२५,श्रावण शुक्लपक्ष.

तिथी- नवमी ०९|४३

रास-वृश्चिक

नक्षत्र- विशाखा ०६|३५

योग- शुक्ल

करण-कौलव

दिनविशेष-७ नं. चांगला

मेष - आजचा दिवस म्हणजे अगदी कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे असा आहे. नको असलेल्या गोष्टी ओढवून घ्याल. आपला स्वार्थ, परमार्थ नसताना सुद्धा या जबाबदाऱ्या झटकून चालणार नाही. अचानक धनलाभ संभवतो आहे.

वृषभ - प्रेमामध्ये वेगळा काहीतरी पराक्रम घडेल. आपल्यातील उमेद नव्याने जागी होईल. व्यावसायिक कामांमध्ये चांगली आगेकुछ होताना दिसून येईल. कोर्टाचे निर्णय मनाप्रमाणे लागतील.

मिथुन - तब्येतीच्या तक्रारी कदाचित डोके वर काढतील. मानसिक ताण आणि तणाव यांनी भरलेला आजचा दिवस आहे. जवळच्या लोकांशी संबंधित दिवस व्यतीत केल्यास मनाला आधार वाटेल. अन्यथा मानसिक उद्विग्नता जाणवेल.

कर्क - एकूणच गुलाबी असा सुंदर दिवस आज आपल्या वाट्याला आलेला आहे. प्रेमामध्ये रंग भराल. नवीन वचने यांनी भारावले पण आज असेल. शेअर्समधील गुंतवणूक चांगली ठरेल. शिव उपासना करा.

सिंह - जागेच्या व्यवहारामध्ये आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल. घरी नवीन वस्तूची खरेदी होईल. संततीसाठी विशेष खर्च करावा लागेल. जबाबदाऱ्या घ्याल आणि पारही पाडाल.

कन्या - लेखन, प्रकाशन मार्गातून प्रगती आहे. जवळचे प्रवास होतील. कुटुंबीयांसाठी विशेष खर्चही कराल. हिशोब मात्र चौख ठेवून पुढे जाल. प्रगतीपथावर आज वाटचाल आहे.

तूळ - धनाची आवक जावक चांगली राहील. मनस्वास्थ्य उत्तम राहील. कुटुंबीय बरोबर, नातेवाईकांबरोबर मेजवानीचे योग आज आहेत. दिवस आनंदी आहे.

वृश्चिक - "मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण" असा दिवस आहे. स्वतःसाठी अनेक गोष्टी आनंदात भर घालणाऱ्या कराल. एकटे असाल तरीसुद्धा आज त्याविषयी खंत वाटणार नाही. सिद्ध आणि प्रसिद्ध होण्याच्याही मार्गावर असाल.

धनु - प्रियकर प्रेयसी बरोबर विनाकारण वाद-विवाद होतील. कदाचित नाते तुटते आहे की काय असे भावना होईल. मनोबल कमी राहील. खर्चाला वाटा अनेक निर्माण होतील. पण आपला मार्ग आपणच चोखाळावा लागेल.

मकर - जुन्या मैत्री भेटीगाठी यामधून दिवस आनंदी राहणार आहे. गुंतवणुकीतून विशेष लाभ होणार आहेत. स्नेहबंध वृद्धिंगत होणार आहेत. दिवस सौख्य घेऊन आलेला आहे.

कुंभ - जे ठरवाल ते आज होईल. कामाला कामाचेच भरते येईल. प्रवासही घडतील मानसन्मान, पैसा, प्रतिष्ठा यामध्ये वाढ होईल. जवळच्या लोकांमधून आपले वाहवा होईल आणि उर भरून येईल. संशोधनात्मक कार्यात प्रगती आहे.

मीन - सद्गुरु कृपा राहील. भाग्यकारक घटनांचा आजचा दिवस आहे. नवनवीन आव्हाने लिलया पेलवून यश सहज मिळून जाईल. प्रेमामध्ये एकरूपता आज येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : ब्रूक-रूटची शतकीय खेळी, नंतर भारतीय गोलंदाजांचं कमबॅक; ओव्हल कसोटीचा निकाल शेवटच्या दिवशी लागणार

Amit Thackeray: मुलींवर हात उचलणाऱ्यांचे हातपाय तोडा, मग पोलिसांना द्या: अमित ठाकरे

JK Encounter: पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ६ चकमकी, २१ दहशतवाद्यांना कंठस्नान

Prajwal Revanna: प्रज्वल रेवण्णाला जन्मठेप; पीडितेच्या साडीवरील स्पर्म मुख्य पुरावा|VIDEO

Borivali News: तलावात आंघोळीसाठी गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू, माजी खासदाराचे पालिका प्रशासनावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT