
पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ६ चकमकी झाल्या.
एकूण २१ दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार मारले.
लष्कर-ए-तैयबाचे कमांडर आणि १२ पाकिस्तानी दहशतवादीही ठार.
भारतीय लष्कर, सीआरपीएफ, बीएसएफ आणि स्थानिक पोलीस यांनी संयुक्त कारवाई केली.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला. तेव्हापासून सुरक्षा दलांनी केंद्रशासित प्रदेशात ६ वेगवेगळ्या चकमकींमध्ये २१ दहशतवाद्यांना ठार मारले. भारतीय लष्कर, सीआरपीएफ, बीएसएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी ही संयुक्तपणे कारवाई केली. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये १२ पाकिस्तानी आणि ९ स्थानिक होते.
सुरक्षा दलांनी अकालमध्ये ऑपरेशन करत लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना ठार केलं. श्रीनगरपासून सुमारे ७० किमी अंतरावर असलेल्या कुलगाममध्ये ही कारवाई करण्यात आलीय. चकमकीत मारल्या गेलेल्यांमध्ये काही रहिवाशांचा समावेश आहे. कुलगामचा रहिवासी झाकीर अहमद गनी, सोपोरचा रहिवासी आणि श्रेणी-अ दहशतवादी आदिल रहमान दंतू आणि पुलवामाचा रहिवासी हरीश दार यांचा समावेश आहे. सुरक्षा दलांच्या मते, स्थानिक भरती आणि सीमापार घुसखोरांना लॉजिस्टिकल मदत करणारे पुन्हा सक्रिय झालेत.
जम्मू आणि काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) जैश-ए-मोहम्मदच्या सात दहशतवाद्यांना ठार केले, जे सर्व पाकिस्तानी नागरिक होते. जैश-ए-मोहम्मद नेटवर्कसाठी ही घातक होती. फॉरेन्सिक आणि बायोमेट्रिक तपासणीतून त्यांची ओळख पटेपर्यंत अधिकाऱ्यांनी त्यांची नावे उघड केलेली नाहीत.
तर शोपियान जिल्ह्यातील केलर जंगलात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी लष्कर-ए- तोयबाच्या तीन प्रमुख दहशतवाद्यांना ठार केले. यामध्ये शाहिद कुट्टे, अदनान शफी दार आणि आमिर बशीर यांचा समावेश होता.
त्रालच्या जंगल परिसरात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मदच्या ३ दहशतवाद्यांना ठार केले, हे सर्व दहशतवादी त्रालचे रहिवासी होते. आसिफ अहमद शेख, आमिर नजीर वाणी आणि यावर अहमद भट अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. ऑपरेशन महादेव अंतर्गत, सुरक्षा दलांनी जम्मू आणि काश्मीरमधील मुलनार गावात लष्कर-ए-तोयबाच्या तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.