
Ind vs Eng 5th Test : अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमधील शेवटचा कसोटी सामना निर्णायक वळणावर पोहोचला आहे. ओव्हल कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे थांबवण्यात आला आहे. उद्या म्हणजेच पाचव्या दिवशी सामन्याचा निकाल लागणार आहे. भारताला जिंकण्यासाठी ४ विकेट्स घ्यायच्या आहेत, दुसऱ्या बाजूला इंग्लंडला जिंकण्यासाठी ३५ धावा हव्या आहेत.
चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला बेन डकेटच्या विकेटच्या स्वरुपात भारताला चांगली सुरुवात मिळाली. त्यानंतर चार ओव्हर्सनंतर कर्णधार ऑली पोप २७ धावांवर बाद झाला. सुरुवातीला असलेली भारताकडची पकड हळूहळू सुटली. ३४ व्या ओव्हरमध्ये हॅरी ब्रूकला जीवनदान मिळाले. मोहम्मद सिराजने हॅरी ब्रूकची कॅच सोडली. त्या ओव्हरमध्ये हॅरी ब्रूकने तब्बल १६ धावा केल्या.
हॅरी ब्रूकने मिळालेल्या संधीचे सोने केले आणि शतक झळकावले. तो आक्रमकपणे फलंदाजी करत असताना दुसऱ्या बाजूला जो रूट संयमी खेळी करत होता. ब्रूकनंतर जो रूटने देखील शतक पूर्ण केले. सामना भारताकडून निसटत असताना सिराजला ब्रूकची विकेट मिळाली. त्याच्यापाठोपाठ जेकब बेथेल आणि जो रूट बाद होऊन माघारी परतले. यादरम्यान लाईट्समुळे सामना थांबवण्यात आला. पुढे पाऊस सुरु झाल्याने चौथ्या दिवसाचा खेळ संपल्याची घोषणा करण्यात आली. आता विजयासाठी इंग्लंडला ३५ धावा करायच्या आहेत आणि भारताला ४ गडी बाद करायचे आहेत.
आतापर्यंत काय घडलं?
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ २२४ धावांवर सर्वबाद झाला होता. त्यानंतर इंग्लंडच्या संघाने २४७ धावा केल्या. पहिल्या डावात करुण नायरने सर्वाधिक अशा ५७ धावा केल्या. दुसऱ्या बाजूला इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने सर्वाधिक ५३ धावा केल्या. दुसऱ्या डावामध्ये यशस्वी जैस्वालने शतकीय खेळी केली. आकाश दीप, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी अर्धशतकीय कामगिरी केली. भारताचा डाव ३९६ धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडकडून बेन डकेटने अर्धशतक झळकावले. जो रूट आणि हॅरी ब्रूक या दोघांनी शतक पूर्ण करत इंग्लंडचा डाव ३०० पार नेला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.