Rashi Bhavishya Today 27 June 2024 Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya Marathi: कोणत्या राशींच्या कटकटी होतील दूर, कोणाला होईल आर्थिक लाभ; जाणून घ्या गुरुवारचं राशीभविष्य

Horoscope Today 27 June 2024 : राशीचक्रानुसार आजचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आलाय? हे जाणून घेण्यासाठी वाचा आजचं राशीभविष्य.

Anjali Potdar

दैनिक पंचांग - गुरुवार दिनांक २७ जून २०२४.

तिथी -ज्येष्ठ कृष्ण षष्ठी. नक्षत्र - शततारका. योग- आयुष्यमान. करण- गरज. रास- कुंभ २८.३२ नंतर मीन .दिनविशेष - १९ पर्यंत चांगला.

मेष: मित्रपरिवार, नातेवाईक दबदबा राहील

आपल्या स्वभावातील नेतृत्वाचे गुण आज काम करतील. जणू काही सैनिक हो तुमच्यासाठी असा दिवस आहे. आपण जे कराल ते इतरांना घेऊन कराल. मित्रपरिवार, नातेवाईक यांच्यामध्ये आपला दबदबा राहील.

वृषभ: काहीतरी नवीन कराल

मुळात शुक्राची असणारी आपली रास. विशेषत्वाने कलेकडे आज कल राहील. काहीतरी नवीन इनोव्हेटिव्ह गोष्टी करण्याचा मानस दिसतो आहे. यामधून कामालाही विशेष वेगळी झालर येईल. पैशाशी निगडित व्यवहार होतील.

मिथुन: जीवनात येईल सकारात्मकता

बोलणे ही आपली कला आणि सहज बोलणे ही अजून उत्तम कला तुमच्याकडे आहे. त्यामुळेच यामधूनच भाग्यदायक घटना घडतील. देवी उपासना, विष्णू उपासना फलदायी ठरणार आहे. सकारात्मकता वाढीला लागेल.

कर्क : आर्थिक व्यवहार जपून करा

आपली चंद्राची हळवी रास आहे. आज काही काय करू आणि काय नको अशा संदिग्ध अवस्थेत दिवस जाणार आहे. शारीरिक मानसिक ताण, कष्ट होतील. पैशाची निगडित व्यवहार मात्र जपून करा. वाईट मार्गातून येणारा पैसा त्रासदायक ठरेल.

सिंह: मनासारखी गोष्टी होणार

जोडीदाराबद्दल आज वेगळीच भावना येईल. उगाचच वर्चस्व दाखवावे असे वाटेल. पण त्यामुळे पदरात काही पडणार नाही. तर जोडीदाराला समजून घ्या. दिवस आनंदाचा राहील. राजाप्रमाणे उदारता ठेवा. मनासारख्या घटना घडतील.

कन्या: बोलण्यामुळे काहींचे मने दुखावतील काळजी घ्या

संदिग्ध व द्विधा न राहता सहजतेने दिवस घालवण्याचा प्रयत्न करा. तरच मनस्वास्थ्य लाभेल. अन्यथा मनामुळे शरीराची दुखणी डोके वर काढतील. जिभेवर आणि पोटावर कंट्रोल ठेवा.

तूळ : आजचा दिवस आनंदात जाणार

शेअर्स, लॉटरी, रेस यामध्ये पैसे गुंतवणार असाल तर दिवस चांगला आहे. पण कुठल्याही मोठ्या उड्या घेऊ नका. क्रीडा क्षेत्रामध्ये प्रगतीचे दिवस आहेत. संततीशी सामोपचाराने वागावे लागेल.

वृश्चिक : महादेवाची उपासना करा

आपल्या राशीतच खूप कामे एकावेळी करण्याची ताकद आहे. पण काही वेळेला करूनही विनाकारण आपल्यावर आळ येतात. तसे काहीसे होऊन आज मनस्ताप वाढेल. म्हणून शिव उपासना फलदायी ठरेल.

धनु : चांगला घडामोडी घडतील

खूपदा आपलेच निर्णय आपल्याला योग्य आहे की नाही कळत नाही. पण आज मात्र घेतलेले निर्णय हे पुढील दृष्टीने फायदेशीर ठरतील. महत्त्वाच्या घटना आणि घडामोडींसाठी आजचा दिवस चांगला आहे.

मकर : गुंतवणुकीसाठी चांगला दिवस

एकादृष्टीने आपल्या राशीला पैसे साठवण्याची जी सवय आहे ही फायदेशीर ठरेल. वेगळी काही गुंतवणूक करण्यासाठी आज दिवस चांगला आहे. मात्र कोणालाही साक्षीदार राहू नका.

कुंभ : आजचा दिवस खर्चिक

आपले व्यक्तिमत्व आज उजळून निघणार आहे. आपल्यामुळे इतरांनाही आनंदाची लहर येणार आहे. स्वतःसाठी वेळ काढाल आणि पैसाही खर्च कराल.

मीन : ताण- तणाव करून घेऊ नका

विनाकारण कटकटी आणि त्रास हे घेऊन आज दिवस आलेला आहे. नको त्या ठिकाणी पैसा खर्च होतोय वायफळ पैसा खर्च होतोय याचा आपल्याला त्रास होऊ शकतो. मनस्ताप टाळा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajsthan Rain : राजस्थानात पावसाचा कहर! मुसळधार पावसामुळे पूर; दोन जण गेले वाहून | VIDEO

NABARD Recruitment: नाबार्डमध्ये सरकारी नोकरीची संधी, या पदांसाठी होणार भरती, अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भारतातील पहिल्या टेस्ला शोरुमचं उद्घाटन

Shocking News : "माझ्याशी फोनवर बोल नाहीतर...", १७ वर्षीय मुलीला धमकी; तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

पाकिस्तानमध्ये जय श्रीराम, मुस्लिम कलाकारांनी सादर केले रामलीला नाट्य; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT