Tula Rashi Bhavishya : तूळ राशीच्या लोकांमध्ये असतात 'या' खास गोष्टी, जाणून घ्या त्यांचा स्वभाव आणि गुण

libra rashi in marathi : तूळ राशीच्या लोकांमध्ये अशा काही खास गोष्टी आहेत. ज्याची माहिती स्वत: या राशींच्या लोकांना देखील नाही. काय विशेष आहे त्यांच्या नशीबात? जाणून घ्या...
Tul Rashi Bhavishya Today
Tul Rashi Bhavishya TodaySaam TV

तूळ ही शुक्राची वायु तत्वाची रास. पुरुष राशी आहे. त्यामुळे स्त्रिया सुद्धा धमक असून पुरुषांसारख्या वागणाऱ्या दिसून येतात. चरराशी आहे म्हणून या लोकांना फिरायला खूप आवडते. तूळ मधला शुक्र हा विशेषत्वाने विचारात घेण्यासारखा आहे. कारण वायु तत्व आहे, बोलकी प्रवृत्ती आणि बुद्धीवादी लोक असतात. स्वतंत्र विचार स्वतंत्र आचार अशा या राशीची धारणा आहे.

ही रास पाहता न्यायदेवता हे याचं रूपच दिलेले आहे. काही वेळेला तडजोड वाटते पण काही इथे बघताना या तराजूला काटा नाहीये. एकाच बाजूने झुकते माप देणारे सुद्धा हे लोक या राशीचे दिसून येतात. तुळ राशीला शनी मात्र उच्चीचा होतो. कर्माला पुढे घेवून जाणारे हे लोक आहेत. त्यामुळे काम हेच कर्म. कर्मकांड याच्यावर विशेषत्वाने जाणारे लोक नाहीत.

तूळमध्ये चित्रा नक्षत्राचे दोन चरण, स्वाती नक्षत्र आणि विशाखाचा एक चरण अशी विभागणी येते. कामाची निगडित जबाबदारी घेतात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधतात. काही वेळेला मात्र विनाकारण नकारात्मक विचारांचा जाळे स्वतःभोवती गुंतवून त्यामध्ये राहायला यांना आवडते.

Tul Rashi Bhavishya Today
Kanya Rashi Personality : कन्या राशीच्या लोकांमध्ये असतात १० खास गोष्टी; इतरांना करतात प्रभावित, जाणून घ्या

कारण अति विचार तसा आचार. अनेक ठिकाणी व्यासपीठ गाजवायला या लोकांना आवडते. त्यासाठी मात्र स्वतः पुढे होऊन करणार इतरांचा विशेषत्वाने विचार या लोकांना नसतो. लोकापवादाला घाबरत नाहीत. प्रेमाच्या बाबतीत सुद्धा हे लोक एकाच ठिकाणी प्रेमावर अनेक दिवस टिकून राहत नाहीत.

सगळ्याच ठिकाणी वावर असतो. मनापेक्षा बुद्धीचा कौल घेतल्याने प्रेमाच्या बाबतीत अपयश आल्याचे जाणवते. कामाला प्राधान्य देतात मनाला नाही. नातेवाईक जपतात. नाती जपतात. पण इतरांनी सुद्धा यांच्यासाठी खूप करावे लागते. श्रद्धा असते पण डोळस असते. वक्ते, वकील, न्यायाधीश, कुठलीही एजंटची कामे, बौद्धिक कामे जी काम आहेत त्यामध्ये हे लोक आपल्याला पुढे जाताना दिसून येतात.

विशेषत्वाने पैशाशी निगडित घडामोडी याही या लोकांचा आवडता छंद आहे. त्यामध्ये आपला व्यवसाय, दुकान असणे फिरतीचे व्यवसाय या गोष्टी या लोकांना जास्त अनुकूल ठरतात. आजाराचा विचार केला तर या राशीच्या लोकांना गायनिक आजार, गुप्तरोग, त्वचेचे आजार, पित्ताचे विकार, विचित्र खाण्यामुळे होणारे आजार हे यांना दिसून येतात. देवी उपासना फलदायी ठरते.

Tul Rashi Bhavishya Today
Horoscope Today : या राशीच्या लोकांनी आज सावधगिरीने पावले टाकावीत, तब्येतीची काळजी घ्या; वाचा आजचे राशीभविष्य!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com