Hans Mahapurush Rajyog saam tv
राशिभविष्य

Hans Mahapurush Rajyog: 100 वर्षांनी दिवाळीला गुरु बनवणार हंस राजयोग; 'या' राशींना बिझनेसमधून मिळणार नफा

Hans Rajyog on Diwali: ज्योतिषशास्त्रानुसार, राजयोग हे मानवी जीवनात मोठे बदल घडवून आणतात. या दिवाळीला एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली योग तयार होणार आहे. सुमारे १०० वर्षांनंतर, गुरू ग्रह आपल्या विशिष्ट राशीत प्रवेश करत आहे, ज्यामुळे ‘हंस राजयोग’ (Hans Rajyog) बनत आहे

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक पंचांगानुसार, दिवाळीचा सण यावर्षी 20 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. यापूर्वीच गुरु बृहस्पति आपली उच्च राशि कर्कमध्ये प्रवेश करणार आहेत. या संयोगामुळे हंस महापुरुष राजयोग निर्माण होणार आहे. ज्याचा प्रभाव काही राशींवर विशेष लक्षात येणार आहे.

या राजयोगामुळे काही राशींच्या आयुष्यात आर्थिक वाढ, करिअरमध्ये प्रगती आणि प्रतिष्ठेची उंची मिळण्याचे योग तयार होणार आहेत. यावेळी कोणत्या राशींना याचा फायदा होणार आहे ते पाहूयात.

तूळ रास (Libra Zodiac)

तूळ राशीसाठी हंस महापुरुष राजयोग लाभदायी ठरू शकतो. कारण हा राजयोग तुमच्या राशीच्या दशम भावावर निर्माण होणार आहे. या काळात तुम्हाला प्रमोशन, नवीन जबाबदाऱ्या, किंवा सामाजिक प्रतिष्ठेत वाढ मिळण्याची शक्यता आहे. तुमची नेतृत्व क्षमता आणि निर्णय घेण्याची शक्ती वाढणार आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे.

कर्क रास (Cancer Zodiac)

कर्क राशीसाठी हंस महापुरुष राजयोग अत्यंत शुभ ठरू शकणार आहे. हा राजयोग तुमच्या राशीच्या लग्न भावावर निर्माण होणार आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढणार आहे आणि मान-प्रतिष्ठा मिळू शकणार आहे. मेहनतीचं योग्य फळ तुम्हाला मिळू शकणार आहे. व्यापारात मोठे सौदे आणि नफा मिळण्याचे योग आहेत.

वृश्चिक राशि (Scorpio Zodiac)

वृश्चिक राशीसाठी हंस महापुरुष राजयोग सकारात्मक परिणाम देऊ शकतो. गुरु ग्रह तुमच्या राशीच्या नवम भावावर गोचर करणार आहेत. या काळात नशीब तुमच्यासोबत राहणार आहे. लहान-मोठ्या प्रवासाची संधी मिळू शकणार आहे. नोकरदारांसाठी दिवाळीनंतर नवीन प्रोजेक्ट्स मिळतील जे करिअरमध्ये प्रगतीची संधी देतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंढरपूरात अतिवृष्टीचा अंदाज, सीना नदीला पुन्हा पुराचा धोका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rainfall: नागरिकांनो सतर्क राहा! आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार, कोकण- विदर्भ अन् मराठवाड्यात जोरदार बॅटिंग

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून भाऊबीज गिफ्ट; २००० रुपये मिळणार

Jio New Recharge Plan: भन्नाट ऑफर! १०० रुपयांत मिळणार हजारो रुपयांचे फायदे; डेटा, मनोरंजन आणि अतिरिक्त ऑफर्स फ्री

Success Story: सरकारी नोकरी सोडली, UPSC परीक्षेत दोनदा फेल, जिद्द नाही सोडली, तिसऱ्या प्रयत्नात IAS; सर्जना यादव यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT