Gajkesari Yog saam tv
राशिभविष्य

Gajkesari Yog: होळीपूर्वी होणार गुरु-चंद्राची युती; गजकेसरी योग 'या' राशींवर पाडणार पैशांचा पाऊस

Gajkesari Yog 2025: देवांचा गुरु बृहस्पति सध्या वृषभ राशीत आहे आणि मे महिन्यापर्यंत या राशीत राहणार आहे. येत्या काळात गुरु आणि चंद्राची युती होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे राजयोगांची निर्मिती होत असते. देवांचा गुरु बृहस्पति सध्या वृषभ राशीत आहे आणि मे महिन्यापर्यंत या राशीत राहणार आहे. येत्या काळात गुरु आणि चंद्राची युती होणार आहे.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र ५ मार्च रोजी सकाळी ८:१२ वाजता वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. ज्या ठिकाणी गुरु बृहस्पति आधीच उपस्थित आहे. अशा परिस्थितीत, गुरु आणि चंद्राच्या युतीमुळे गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. यामुळे काही राशींच्या लोकांना करियरमध्ये चांगली संधी मिळणार आहे. तर काही राशींना पैसा मिळू शकणार आहे.

मीन रास

या राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांना प्रसिद्धीसोबतच खूप आदर मिळू शकणार आहे. तुम्हाला बऱ्याच काळापासून ज्या समस्येचा सामना करावा लागत आहे त्यात यश मिळू शकते. करिअरच्या क्षेत्रातही तुम्हाला अनेक फायदे मिळणार आहे. व्यवसायात तुम्ही निर्माण केलेली कल्पना यशस्वी होऊ शकते.

कुंभ रास

या राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग फायदेशीर ठरू शकतो. या राशींच्या सुखसोयींमध्ये वेगाने वाढ होणार आहे. तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या करिअरवर असणार आहे.कामाची प्रशंसा होण्यासोबतच तुम्हाला प्रगतीच्या संधी मिळू शकतात. जीवनात आनंद आणि शांती असेल.

वृश्चिक रास

या राशीत, गुरु आणि चंद्राची युती सातव्या घरात होणार आहे. अशा परिस्थितीत, या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळू शकते. करिअरच्या बाबतीत गजकेशरी राजयोग तुमच्यासाठी भाग्यवान ठरू शकतो. भागीदारीत केलेल्या व्यवसायात मोठा नफा मिळणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhaskar Jadhav : विरोधी पक्षनेतेपदावरुन भास्कर जाधव आक्रमक, वाचा नेमकं काय म्हणाले...

Maharashtra Live News Update: विरोधी पक्षनेतेपदाबाबत अफवा, अफवांवर विश्वास ठेवू नका - आदित्य ठाकरे

पहिली गोवा ट्रीप शेवटची ठरली; एकीला वाचवण्यासाठी दोघींनी घेतली आगीत उडी, तिघींचा होरपळून मृत्यू

Non Acidity Upma Recipe : पित्त न वाढवणारा उपमा कसा बनवायचा? सोपी स्टेप-बाय-स्टेप पद्धत

PM Kisan Yojana : शेतकर्‍यांसाठी महत्त्वाची बातमी! या कारणामुळे २२ वा हप्ता अडकणार, तुम्ही ही चूक केली नाही ना?

SCROLL FOR NEXT