Mahashivratri 2025: 152 वर्षांनी महाशिवरात्रीला होणार ग्रहांचा दुर्मिळ संयोग; 'या' ३ राशींना नव्या नोकरीसह मिळणार धनलाभ

Mahashivratri Grah Gochar: ग्रहांच्या या संयोजनामुळे काही राशींचं आयुष्य चमकणार आहे, तर काही राशींना या काळात अधिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते जाणून घेऊया.
Mahashivratri 2025
Mahashivratri 2025saam tv
Published On

एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे प्रत्येक राशींच्या जीवनावर परिणाम होत असतो. ज्योतिष्य शास्त्रामध्ये प्रत्येक हिंदू धर्मातील सणांना महत्त्व दिलं जातं. येत्या बुधवारी महाशिवरात्रीचा मोठा सण असून या दिवशी ग्रहांची स्थिती देखील विशेष असणार आहे.

अनेक वर्षांनंतर महाशिवरात्रीला दुर्मिळ ग्रहांचे संयोजन होणार आहे. शुक्र त्याच्या उच्च राशी मीनमध्ये असणार आहे आणि राहू देखील त्याच्यासोबत असेल. हा एक शुभ योग मानला जातो. सूर्य आणि शनि कुंभ राशीत राहणार असून हा योग जवळजवळ १५२ वर्षांनंतर तयार होतोय. ज्यामुळे काही राशींचे भाग्य चमकू शकणार आहे.

Mahashivratri 2025
Chandra Grahan 2025: 14 मार्चपासून 'या' राशींच्या आयुष्यात येणार वादळ; पैशांच्या नुकसानीसह आरोग्यही बिघडणार

ग्रहांच्या या संयोजनामुळे काही राशींचं आयुष्य चमकणार आहे, तर काही राशींना या काळात अधिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते जाणून घेऊया.

मकर रास

ग्रहांचं दुर्मिळ संयोजन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होणार आहे. जर तुम्ही यावेळी नोकरी करत असाल तर तुम्हाला आर्थिक वाढ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. देशात आणि परदेशात प्रवास करू शकता. तुम्ही तुमचे सर्व निर्णय पूर्ण आत्मविश्वासाने घेऊ शकणार आहात. धाडसी निर्णयांचा तुम्हाला फायदा होऊ शकणार आहे.

Mahashivratri 2025
Shani-Rahu Yuti: 30 वर्षानंतर मीन राशीत राहू-शनीची युती; 'या' ३ राशी जगणार ऐशो-आरामाचं आयुष्य

मेष रास

महाशिवरात्रीला निर्माण होणारे दुर्मिळ ग्रहांचं संयोजन मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. तुम्हाला नोकरी बदलण्याच्या प्रयत्नांमध्ये यश मिळू शकणार आहे. नोकरी करणाऱ्या आणि व्यापारी वर्गातील लोकांसाठी परिस्थिती अनुकूल राहणार आहे. नफा आणि प्रगतीची शक्यता आहे.

मिथुन रास

महाशिवरात्रीला घडणारा दुर्मिळ योगायोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुमचे व्यक्तिमत्व सुधारणार आहे. सरकारी कामातही यश मिळण्याची शक्यता आहे. तुमचं काम पूर्ण होणार आहे. तुमच्या उत्पन्नात भरघोस वाढ होण्याची शक्यता आहे.

Mahashivratri 2025
Trigrahi Yog: मीन राशीत तयार होणार त्रिग्रही राजयोग; 'या' ३ राशींच्या व्यक्ती गडगंज श्रीमंती अनुभवणार

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com