Sun And Jupiter Conjunction In Mithun saam tv
राशिभविष्य

Guru Aditya Yog: बुधाच्या राशीत बनणार ‘गुरु आदित्य राजयोग’; 'या' राशींचं नशीब चमकणार

Sun And Jupiter Conjunction In Mithun: ग्रहांच्या गोचरमुळे खास राजयोग तयार होतात. यावेळी सूर्य आणि गुरुच्या युतीमुळे खास राजयोग निर्माण होणार आहे. यामध्ये कोणत्या राशींना सकारात्मक परिणाम मिळणार आहे ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

Sun And Jupiter Conjunction In Mithun: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रहांच्या या गोचरमुळे अनेकदा शुभ आणि राजयोग निर्माण करतात. या राजयोगांचा परिणाम प्रत्येक राशींच्या व्यक्तींवर होत असतो.

जूनमध्ये सूर्य आणि देवांचा गुरु बृहस्पति यांची युती होणार आहे. ज्यामुळे १२ वर्षांनी गुरु आदित्य राजयोग निर्माण होणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींसाठी सुवर्णकाळ सुरू होणार आहे. या काळात करियरमध्ये तुम्हाला चांगली संधी उपलब्ध होऊ शकते. यावेळी कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी गुरु आदित्य राजयोग सकारात्मक परिणाम मिळणार आहेत. या काळात गुंतवणुकीत नफा होणार आहे. करिअरमध्ये अनपेक्षित प्रगती होण्याची शक्यता आहे. कुठेही तुमचे अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या इच्छा पूर्ण होतील.

कन्या रास

गुरु आदित्य राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. तुम्हाला तुमच्या कामात विशेष प्रगती मिळू शकणार आहे. जीवनात सुखसोयी आणि सुविधा वाढणार आहेत. यावेळी तुमच्या पदोन्नतीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. आर्थिक परिस्थितीत मोठी सुधारणा होण्याची शक्यता आहे.

मीन रास

गुरु आदित्य राजयोग बनणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कुटुंबात आनंद आणि शांती नांदणार आहे. पैशाच्या गुंतवणुकीशी संबंधित तुमच्या योजना यशस्वी होणार आहेत. व्यवसायात अचानक मोठा नफा होऊ शकतो. तुम्हाला पैसे मिळू शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mulyachi Bhaji Recipe : हिवाळ्यात आवर्जून बनवा गावाकडे बनवतात 'तशी' मुळ्याची भाजी, वाचा खास रेसिपी

Maharashtra Live News Update: नवले पुलाजवळील पुन्हा अपघात

Maharashtra Weather : महाराष्ट्र गारठला! धुळे ५.४ अंशावर, पुढील ४ दिवस पारा आणखी घसरणार

Shukra Nakshatra Gochar: उद्या शुक्र करणार नक्षत्र परिवर्तन, या राशी जगणार ऐशो आरामात आयुष्य

Nagpur : उपराजधानी नागपुरात घातपाताची शक्यता, जैशकडून धमकी, १० हजार पोलीस तैनात

SCROLL FOR NEXT