Guru Gochar 2025 Jupiter Planet saam tv
राशिभविष्य

Guru Gochar: ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम; गुरुच्या गोचरमुळे होणार लाभ

Jupiter Transit in Cancer: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका निश्चित वेळेनंतर आपले स्थान बदलतो, ज्याला 'गोचर' (Transit) असे म्हणतात. ग्रहांचा राजा मानला जाणारा गुरू (Jupiter) ग्रह लवकरच आपले स्थान बदलणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार देवगुरु बृहस्पति साधारण १३ महिन्यांनी एकदा आपली रास बदलतात. सध्या गुरु मिथुन राशीत भ्रमण करत आहेत. तर येत्या ऑक्टोबर महिन्यात ते कर्क राशीत प्रवेश करणार आहेत. कर्क राशीचा अधिपती चंद्र आहेत.

गुरुचं गोचर सर्व १२ राशींवर वेगवेगळा परिणाम करणार असतं. मात्र असं असूनही काही भाग्यशाली राशींना याचा विशेष लाभ मिळणार आहे. या काळात समाजमान, आर्थिक उन्नती तसेच अनेक शुभ फळांचा योग निर्माण होणार आहे. पाहूया कोणत्या राशींना गुरुंच्या या कर्क गोचराचा जास्तीत जास्त फायदा होईल.

मिथुन राशी

मिथुन राशीच्या व्यक्तींना गुरुच्या कर्क गोचरामुळे मोठा लाभ होणार आहे. काही काळापासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात ज्यामुळे आर्थिक स्थिरता लाभेल. नातेसंबंधांमध्ये गोडवा आणि जवळीक वाढेल. नोकरीत प्रगतीची शक्यता आहे तसेच उत्पन्नाचे नवे मार्ग उपलब्ध होतील. अविवाहितांना लग्नासाठी चांगले प्रस्ताव येऊ शकतात.

कन्या राशी

कन्या राशीच्या जातकांसाठी गुरुचं हे गोचर अतिशय फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नाच्या संधी वाढणार आहेत. व्यवसायात मजबुती येईल तसेच जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकेल. नवीन गुंतवणुकीसाठी देखील चांगले अवसर मिळणार आहेत. रोजगाराच्या शोधात असलेल्यांना योग्य संधी हाती येण्याची शक्यता आहे.

तूळ राशी

तूळ राशीच्या व्यक्तींनाही गुरुच्या गोचराचा लाभ होणार आहे. या काळात तुमचे पराक्रम रंगतील. नोकरीच्या नवीन संधी मिळतील तसेच प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये तुम्हाला नवी जबाबदारी किंवा महत्त्वाची भूमिका मिळू शकते. आर्थिकदृष्ट्या स्थिती भक्कम होईल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kojagiri Purnima 2025: कोजागिरी पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या योग्य पूजा पद्धत आणि महत्व

GK : मध खरंच कधीच खराब होत नाही का? जाणून घ्या

Cyber Fraud : सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात पोलीसच अडकला, लिंकवर क्लिक केलं अन्....

Twinkle Khanna: ऋषी कपूरविषयी ट्विंकल खन्नाचा धक्कादायक खुलासा; म्हणाली “मी तुझी नणंद…” हे ऐकताच आलिया भट्टला बसला धक्का

Maharashtra Live News Update : रामदास कदम यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा करणार- अनिल परब

SCROLL FOR NEXT