Janmashtami and zodiac signs: जन्माष्टमीला शनीसह ग्रह होणार वक्री; 'या' ४ राशींकडे येणार पैसाच पैसा

Saturn retrograde Janmashtami: जन्माष्टमीचा पवित्र दिवस भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवशी अनेक शुभ योग आणि ग्रहांची विशेष स्थिती तयार होत असतात.
Saturn retrograde Janmashtami
Saturn retrograde Janmashtamisaam tv
Published On

भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव म्हणून जन्माष्टमी साजरी केली जाते. यंदाच्या वर्षी हा पवित्र सण १६ ऑगस्ट म्हणजेच शनिवारी या दिवशी साजरा केला जाणार आहे. धार्मिक मान्यतानुसार, भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री अष्टमी तिथीला झाला होता. त्यामुळे भक्त या दिवशी उपवास, पूजन आणि रात्रीच्या वेळी जन्मोत्सवाचा सोहळा साजरा करतात.

ज्योतिषांच्या मते, यंदाच्या कृष्ण जन्माष्टमीला ग्रहांचा अत्यंत अद्भुत संयोग घडणार आहे. या दिवशी शनी, राहू आणि केतु वक्री स्थितीत राहणार आहेत. याशिवाय बुध मार्गी अवस्थेत असेल. ज्योतिषशास्त्रानुसार या चार ग्रहांची ही स्थिती काही राशींकरिता अतिशय लाभदायक ठरणार आहे.

Saturn retrograde Janmashtami
Guru Uday: ९ जुलैपासून चमकणार ३ राशींचं नशीब; गुरु ग्रहाच्या उदयाने होणार लाभ

वृषभ रास

वृषभ राशीच्या जातकांसाठी यंदाची जन्माष्टमी आर्थिक दृष्ट्या शुभ ठरणार आहे. धनलाभाच्या अनेक संधी मिळू शकणार आहेत. नशीब साथ देणार आहे. त्याचप्रमाणे अडकलेली कामं पूर्ण होणार आहेत.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी हा दिवस अत्यंत मंगलकारी ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल आणि प्रत्येक कार्यात यश मिळणार आहे. नोकरीत बढती आणि आर्थिक लाभाच्या संधी मिळणार आहे.

Saturn retrograde Janmashtami
Mahalakshmi Yog: उद्यापासून 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार; महालक्ष्मी योगामुळे होणार धनलाभ

तूळ रास

तूळ राशीच्या जातकांना या दिवशी समाजात मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे. नवीन कामांची सुरुवात करण्याची संधी लाभणार आहे. घरातील आणि वैयक्तिक जीवनात सुख-समृद्धी वाढेल तसेच प्रतिष्ठेतही भर पडण्याची शक्यता आहे.

Saturn retrograde Janmashtami
Malavya Rajyog 2025: 50 वर्षांनंतर चमकणार 'या' राशींचं नशीब; मालव्य आणि बुधादित्य राजयोग मिळवून देणार धनलाभ

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठीही कृष्ण जन्माष्टमी शुभ फलदायी ठरणार आहे. भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने जीवनात आनंद आणि समृद्धी येणार आहे. आरोग्य उत्तम राहील आणि प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com