Ganesh Chaturthi 2024 saam tv
राशिभविष्य

Ganesh Chaturthi 2024: 'या' तीन राशींवर राहणार गणपती बाप्पाची कृपा; अनंत चतुदर्शीपर्यंत मिळणार पैसा, पद आणि प्रतिष्ठा

Surabhi Kocharekar

सध्या सगळीकडे गणपती बाप्पााच्या आगमनामुळे वातावरण मंगलमय आहे. शास्त्रानुसार, प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये पहिल्यांना गणपतीची पुजा केली जाते. यामुळे लोकांच्या जीवनात सुख-समृद्धी येते असं मानलं जातं. आपल्यापैकी अनेकांच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. अशातच गणपती बाप्पााच्या ४ प्रिय राशी आहेत.

या राशींवर गणपती बाप्पाची नेहमी कृपा असते. यंदाच्या गणेश चतुर्थिला सर्वार्थ सिद्धी योग तयार झाला आहे. यावेळी गणपती बाप्पाचा कोणत्या राशींवर विशेष आशीर्वाद असणार आहे हे पाहूयात.

मेष रास

या राशींच्या व्यक्तींवर गणपती बाप्पाची नेहमी कृपा असते. यावेळी गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. गणेशाच्या कृपेने तुम्हाला आर्थिक लाभ होईल. तुमच्या कुटुंबामध्ये सर्व गोष्टी सुरळीत पार पडणार आहेत. पैशाशी संबंधित समस्याही संपुष्टात येतील.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांवर बाप्पा नेहमीच दया दाखवतो. या काळात तुम्हाला करिअर आणि व्यवसायात खूप नाव कमावू शकता. या राशींचे लोक व्यवसायात नवीन कल्पनांद्वारे पैसे कमवू शकतात. व्यवसायातही कोणत्या ना कोणत्या मार्गाने फायदा होईल.

मकर रास

मकर राशीला गणेशाची नेहमी कृपा राहते. गणपती बाप्पाच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती सदैव मजबूत राहणार आहे. तुमचं परदेशात काम करण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकते. कामकाजात तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. मालमत्ता आणि वाहन खरेदीची इच्छा पूर्ण होऊ शकते.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

IND vs BAN: पहिल्याच डावात केलेल्या या 3 चुका टीम इंडियाला महागात पडू शकतात

SCROLL FOR NEXT