Chandra Grahan: 'या' राशींच्या आयुष्यावर पितृ पक्षात लागणार ग्रहण; चंद्र ग्रहणामुळे आर्थिक नुकसानीची शक्यता

Chandra Grahan: गणपतीनंतर पितृ पक्ष सुरु होणार आहे. यंदाच्या पितृ पक्षामध्ये चंद्र ग्रहण लागणार आहे. याचा राशींवर कसा परिणाम होणार आहे, ते पाहूया.
Chandra Grahan 2024 in Pitru Paksha
Chandra Grahan 2024 in Pitru Pakshasaam tv
Published On

गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून अनेकांच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. अनंतर चतुर्दशीनंतर पितृ पक्ष सुरु होणार आहे. यंदाच्या वर्षी भारतात दुसरं चंद्रग्रहम पितृ पक्षातध्ये लागणार आहे. चंद्रग्रहणाचा श्राद्ध उत्सवाच्या विधींवर काही परिणाम होणार का असा प्रश्न आता लोकांच्या मनात आहे.

यंदाच्या वर्षी पितृपक्ष 17 सप्टेंबरपासून सुरू होणार असून 2 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. तर चंद्रग्रहण 18 सप्टेंबर रोजी लागणार आहे. या वर्षातील हे दुसरं चंद्रग्रहण असणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 06:12 पासून हे चंद्रग्रहण सुरु होणार असून सकाळी 10:17 पर्यंत राहणार आहे.

भारतात दिसणार का चंद्रग्रहण?

वर्षातील पहिलं चंद्र ग्रहण भारतात दिसलं नव्हतं. त्याचप्रमाणे आता १८ सप्टेंबर रोजी लागणारं दुसरं चंद्रग्रहण देखील भारतात दिसणार नाहीये. शास्त्रानुसार, चंद्रग्रहण भारतात दिसत नसल्याने श्राद्ध तसंच पिंड दान इत्यादी पितरांसाठी केल्या जाणाऱ्या विधींवर याचा कोणताही परिणाम होणार नाहीये.

Chandra Grahan 2024 in Pitru Paksha
Shash Rajyog: 'या' राशींवर शनीदेवाचा आशीर्वाद; शश राजयोगामुळे नव्या नोकरीसह होणार धनलाभ

हे चंद्र ग्रहण जरी भारतात दिसत नसलं तरी त्याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे. यावेळी हे ग्रहण काही राशींसाठी लाभदायक ठरणार नाहीये. जाणून घेऊया यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे.

मेष रास

या चंद्र ग्रहणामुळे या राशींच्या व्यक्तींवर संकटं येण्याची शक्यता आहे. या काळात पैसा तुमच्या हाती टिकणार नाही. नोकरीमध्ये समस्या येऊ शकतात.

सिंह रास

हे चंद्र ग्रहण तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं. या काळात तुम्हाला कुटुंबातील समस्यांचा सामना करावा लागू शकतो. करियमरमध्ये तुमच्या मनाजोग्या गोष्टी घडणार नाही. व्यापारामध्ये हानी होऊ शकते.

मकर रास

मकर राशीच्या व्यक्तींसाठी हे चंद्र ग्रहण अशुभ ठरू शकतं. या काळात तुमच्यावर नकारात्मक गोष्टींचा प्रभाव असू शकतो.

मीन रास

चंद्र ग्रहण लागण्याच्या काळात या राशींना सावध राहण्याचा सल्ला आहे. यावेळी तुमचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमचे इतरांशी वाद होऊ शकतात.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Chandra Grahan 2024 in Pitru Paksha
Malavya rajyog: १० दिवसांनी तयार होणार मालव्य राजयोग; 'या' राशींना होणार धनलाभ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com