Horoscope In Marathi Saam tv
राशिभविष्य

Friday Horoscope : नको त्या ठिकाणी खरे बोलणे टाळलेले बरे; ५ राशींच्या लोकांनी महत्वाची कामे पुढे ढकला अन्यथा...

Friday Horoscope Marathi : आज काही राशींच्या लोकांना नको त्या ठिकाणी खरे बोलणे टाळावे लागेल. तर काहींना सरकारी कामे पुढे ढकलावी लागेल.

Anjali Potdar

पंचांग

शुक्रवार,७ नोव्हेंबर २०२५,कार्तिक कृष्णपक्ष.

तिथी-द्वितीया ११|०६

रास-वृषभ

नक्षत्र- रोहिणी

योग-परिघ

करण-गरज

दिनविशेष-शुभदिवस

मेष - धनाची बरकत होण्याचा आजचा दिवस आहे. आलेला पैसा खर्चही करायला आज तुम्ही मागे पुढे पाहणार नाहीत. तिखट, मसालेदार, तेलकट पदार्थ खाण्याची विशेष रुची वाढेल. दिवस संमिश्र आहे.

वृषभ - मुळात रसिक असणारी आपली रास मनातील मनोदय अजूनच पूर्णत्वाला जाण्याचा दिवस आहे. जे ठरवाल ते करालच. सोप्या गोष्टी मनोबल चांगले असल्यामुळे अजून सोप्या होतील. दिवस आरोग्यदायी आहे.

मिथुन - नको त्या ठिकाणी खरे बोलणे आज टाळलेले बरे. आपल्या बोलण्यामुळे कटकटी निर्माण होतील. व्यावसायिक ठिकाणी मात्र आज कुठेही साक्षीदार राहू नका. सरकारी कामे शक्यतो पुढे ढकलेली बरी राहतील.

कर्क - परदेशी वार्तालाप होईल. व्यवसायामध्ये नव्याने सृजनशीलता येईल. नवीन संधी आणि वाटा सहज उपलब्ध होतील. दिवसाच्या शेवटी दिवस सार्थकी लागला आहे अशी भावना निर्माण होईल.

सिंह - राजकारणामध्ये कामे करण्याची पद्धत, आपल्या राशीच्या लोकांच्या मध्ये मुळातच असते पुढारीपण मिरवायला आवडते लोकांनी केलेले कौतुक आवडते या सर्व गोष्टी तुमच्या झोळीत आज सहज येणार आहेत.

कन्या - विष्णू उपासना आजच्या दिवशी फलदायी ठरणार आहे. तीर्थक्षेत्रे भेटी होतील. नोकरी व्यवसायामध्ये विशेष वृद्धी होण्याचा आजचा दिवस आहे. यशाची दालने आपल्यासाठी वाट पाहत आहेत डोळे उघडे ठेवून वाटचाल करा.

तूळ - "आले माझ्या राशीला" अशीच भावना आज निर्माण होईल. परिस्थितीशी दोन हात करावेच लागतील. एकटेपण असले तरी सावरून पुढे जावे लागेल. वामार्गातून पैसा संभवतो आहे.

वृश्चिक - धीरोदत्तपणा आज सीमा गाठेल. कोर्टाच्या कामामध्ये विशेष यश मिळेल. कोणत्याही गोष्टीला न डगमगता पुढे जाल. सर्व गोष्टी आपल्याच स्तरावर नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न कराल.

धनु - पायाच्या दुखण्यापासून आज सावध राहावे लागेल. नको असलेल्या लोकांच्या पासून चार हात लांब रहा. काही वेळेला "मन चिंती ते वैरी न चिंती" असा काहीसा दिवस असतो. आज आपल्या मनाचा कौल घ्या आणि पुढे जा.

मकर- शंकराची उपासना आज करावी. उत्तम फल मिळेल. गुंतवणुकीला, पैशाची आवक जावक, स्व कमाईचा पैसा, शिक्षणामधून मिळणारा पैसा, संततीकडून मिळणाऱ्या सुख वार्ता या सर्व गोष्टींची आज लाईन आहे.क्रीडा आणि कला क्षेत्रात सुद्धा प्रगती होईल.

कुंभ - घरातील ज्येष्ठांचा आदर करा.जुन्या गोष्टी सोडून नव्याकडे पाऊलवाट करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. मनोवंचित घटना घडतील. एकूण सर्व सुखाचे आगमन आज दारी होणार आहे.

मीन - बहिणीची विशेष माया आणि प्रेम आपल्यावर आज असेल. भावंडांच्या मार्गदर्शनाने पुढे जाल. रेंगाळलेले पत्रव्यवहार मार्गी लागणार आहेत. तसेच जवळचे प्रवासही घडतील. दिवस संमिश्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT