Grah Gochar Horoscope saam tv
राशिभविष्य

Grah Gochar Horoscope: दिवाळीपूर्वी ४ ग्रहांच्या स्थितीत बदल; 'या' राशींचे आर्थिक प्रश्न मिटणार, कमाईच्या नव्या संधी उपलब्ध

Grah Gochar Horoscope: सध्या ऑक्टोबर महिना सुरु असून या महिन्यात दिवाळीपूर्वी काही ग्रहांनी गोचर केलंय. अशा स्थितीत या 4 ग्रहांच्या चालीतील बदलामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्रानुसार ठराविक वेळेनंतर ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरचा राजयोग तयार होतात. हे राजयोग आणि ग्रहांच्या गोचरचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होताना दिसतो. सध्या ऑक्टोबर महिना सुरु असून या महिन्यात दिवाळीपूर्वी काही ग्रहांनी गोचर केलंय.

दिवाळीपूर्वी 4 मोठ्या ग्रहांच्या हालचालीत बदल झाला असून ज्यामध्ये गुरू 9 ऑक्टोबर रोजी वक्री झाला आहे. यासोबत 10 ऑक्टोबर रोजी सूर्य देवाने हस्त नक्षत्रातून बाहेर पडून चित्रा नक्षत्रात प्रवेश केलाय. तसंच याच दिवशी 10 ऑक्टोबरला बुधाने तूळ राशीत प्रवेश केला असून 13 ऑक्टोबरला शुक्र वृश्चिक राशीत प्रवेश करेल. अशा स्थितीत या 4 ग्रहांच्या चालीतील बदलामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

मिथुन रास

दिवाळीपूर्वी 4 ग्रहांच्या हालचालीतील बदल अनुकूल ठरू शकणार आहेत. बुध ग्रह तुमच्या राशीच्या पाचव्या घरातून वक्री झाला आहे. या काळात तुम्ही पैशांची बचत करण्यात यशस्वी होणार आहात. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी परदेशात जाण्यात यश मिळू शकणार आहे.कौटुंबिक मतभेद संपुष्टात येणार आहे.

मेष रास

दिवाळीपूर्वी 4 ग्रहांच्या चालीतील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक नफा मिळू शकणार आहे. तुम्हाला काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळू शकणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे सहकार्य मिळणार आहे. विवाहित लोकांचं वैवाहिक जीवन चांगलं राहणार आहे. व्यापारातील कामातूनही तुम्हाला फायदा होऊ शकणार आहे.

सिंह रास

4 ग्रहांच्या हालचालीतील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात नोकरी आणि व्यवसायात विशेष प्रगती होणार आहे. नवीन व्यावसायिक संबंधांच्या निर्मितीमुळे व्यवसायाच्या विस्तारासाठी हा काळ अनुकूल आहे. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील. नोकरदारांना पदोन्नती आणि वेतनवाढ मिळू शकते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish Deshmukh Hairstyles: पांढऱ्या केसांपासून ते पोनीपर्यत.. रितेश भाऊच्या 10 हेअरस्टाईने लावलं 'वेड'; PHOTO

Trending Chappal Design : नऊवारी साडी असो नाहीतर वनपीस, फॅशनच्या दुनियेत 'ही' चप्पल कायम १ नंबर

Maharashtra News Live Update: जालन्यात पारा ४२ अंशावर, हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा 'यलो अलर्ट'

Ladki Bahin Yojana eKYC: आधार नंबर टाकूनही ओटीपी येत नाही; लाडक्या बहिणींना ईकेवायसी करताना अडचणी

नमाज पढता येतो का? मुंबईत पहलगामसारखा हल्ला; २ जणांवर चाकूने सपासप वार, ISIS कनेक्शन ?

SCROLL FOR NEXT