Budhaditya Rajyog 2025 saam tv
राशिभविष्य

Budhaditya Yog: 12 महिन्यांनी मेष राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींच्या व्यक्तींना लागणार लॉटरी

Budhaditya Yog 2025: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी दोन ग्रहांच्या युतीने राजयोगाची निर्मिती होते. असंच ७ मे रोजी एका राजयोगाची निर्मिती होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ग्रहांचा राजा सूर्य हा दर महिन्याला त्याच्या राशीत बदल करतो. सध्या सूर्य त्याची उच्च राशी मेषमध्ये आहे. याशिवाय ग्रहांचा राजकुमार बुध सुमारे १५ दिवसांनी आपल्या राशीमध्ये बदल करतो. ज्याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येतो. ७ मे रोजी बुध मेष राशीत प्रवेश करणार आहे. ज्यामुळे बुधादित्य राजयोग निर्माण होतो.

सूर्य आणि बुधामुळे तयार होणार्‍या बुधादित्य राजयोगाच्या निर्मितीमुळे प्रत्येक राशीच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होणार आहे. यावेळी तिन्ही राशींना प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यशासोबतच आर्थिक लाभही मिळू शकणार आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ मिळेल ते पाहूयात.

कुंभ रास

या राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीच्या तिसऱ्या घरात हा राजयोग तयार होणार आहे. या राशीच्या लोकांना व्यवसायात भरपूर नफा मिळू शकतो. आवडत्या कंपनीकरून तुम्हाला नोकरीची ऑफर मिळू शकते. तुमचा कल अध्यात्माकडे जास्त असणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकणार आहात.

मकर रास

या राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग फायदेशीर ठरू शकणार आहे. वाहन आणि मालमत्तेचं सुख तुम्हाला मिळणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना यश मिळू शकणार आहे. रिअल इस्टेट आणि एजंटसाठी हा चांगला काळ असू शकतो.

तूळ रास

या राशीच्या सातव्या घरात बुधादित्य राजयोगाची निर्मिती होणार आहे. या राशीच्या लोकांचा काळ चांगला जाणार आहे. मोठा प्रवास करण्याची योजना आखू शकता. या काळात तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची मदत मिळेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

SCROLL FOR NEXT