Rashi Surya Gochar  google
राशिभविष्य

Surya Gochar: नवरात्रीनंतर सूर्यदेव करणार गोचर; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार पैसाच पैसा

Sun Planet Transit In Tula: सूर्य देव दर महिन्याला त्यांच्या राशीत बदल करतात. १७ ऑक्टोबरनंतर सूर्य देव तूळ राशीत प्रवेश करणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे सर्व राशींच्या व्यक्तींवर काही ना काही परिणाम होतो. ज्योतिषानुसार, सूर्य देव दर महिन्याला त्यांच्या राशीत बदल करतात.

नवरात्रीनंतर म्हणजेच १७ ऑक्टोबरनंतर सूर्य देव तूळ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य देवाचं गोचर काही राशींना शुभ परिणाम देणार आहे. या काळात काही राशींचं भाग्य चमकू शकणार आहे. यावेळी कोणत्या राशींना चांगले परिणाम मिळणार आहे ते पाहूयात.

सिंह रास

सूर्य देवाच्या राशीतील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. सूर्य देव तुमच्या राशीतून तिसऱ्या भावात जाणार आहे. या काळात तुमच्या व्यवसायात प्रगती होणार आहे. नोकरदार लोकांना त्यांच्या करिअरचा पूर्ण लाभ मिळणार आहे. कुटुंबातील व्यक्तींकडून तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकणार आहेत.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी सूर्य देवाच्या राशीतील बदल शुभ ठरू शकतात. या काळात तुम्हाला मोठं यश मिळणार आहे. बऱ्याच दिवसांपासून अपूर्ण पडलेल्या सर्व गोष्टी पूर्ण होऊ शकतात. या काळात तुम्ही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार आहात.

कर्क रास

सूर्यदेवाचं गोचर तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक नफा मिळू शकतो. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता. जोडीदारासोबत आनंददायी क्षण घालवाल. या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून बीड शहरात नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बैठका सुरू

Delhi Blast: स्फोट घडवण्यासाठी दोन कारचा वापर? i20 नंतर EcoSport कारचा शोध सुरू

कर्णबधिर असल्याचे भासवून थेट तहसीलदाराची नोकरी मिळवली? प्रशासकीय वर्तुळात खळबळ| VIDEO

Maharashtra Politics: बीडमध्ये मोठा राजकीय भूकंप, ४ वेळा आमदार आणि मंत्री राहिलेला नेता अजित पवार गटाच्या वाटेवर

GenZ Search Trends: १८ वर्षांचे तरुण गुगलवर काय सगळ्यात जास्त सर्च करतात? उत्तर जाणून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT