Shukra Gochar: दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्र बदलणार रास; 'या' राशींना बिझनेसमधून मिळणार पैसा

Venus Transit In Scorpio: 13 ऑक्टोबर रोजी धन-समृद्धी देणाऱ्या शुक्राच्या स्थितीमध्ये बदल होणार आहे. जाणून घेऊया या काळात कोणत्या राशींना शुक्राच्या गोचरमुळे सकारात्मक परिणाम भोगावे लागणार आहेत.
Shukra Gochar
Shukra Gocharsaam tv
Published On

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. शास्त्रानुसार, यंदाच्या वेळी 12 ऑक्टोबरला दसरा सण साजरा केला जाणार आहे. तर दुसऱ्या दिवशी 13 ऑक्टोबर रोजी धन-समृद्धी देणाऱ्या शुक्राच्या स्थितीमध्ये बदल होणार आहे.

१३ ऑक्टोबर रोजी शुक्र वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. या काळात काही राशींच्या आयुष्यात सुखाचे क्षण येणार आहे. काही राशींना अचानक पैसे मिळतील तर काही राशी संपत्तीत वाढ होणार आहे. जाणून घेऊया या काळात कोणत्या राशींना शुक्राच्या गोचरमुळे सकारात्मक परिणाम भोगावे लागणार आहेत.

Shukra Gochar
Trigrahi Yog : ५० वर्षांनंतर कन्या राशीत बनला त्रिग्रही राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकणार

कर्क रास

शुक्राचं गोचर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तुमचे प्रेमसंबंध चालू असतील तर तुम्हाला त्यात यश मिळू शकणार आहे. तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचे नाते अधिक घट्ट होणार आहे. तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकणार आहे. तुम्हाला समाजात मान-सन्मान मिळणार आहे.

मकर रास

शुक्राचं गोचर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुमचे उत्पन्न प्रचंड वाढू शकणार आहे. कुटुंबाकडून सहकार्य मिळू शकतं. तुमचं जीवन आनंदी असणार आहे. काही लोकांना त्यांच्या बिझनेसमध्ये चांगला नफा मिळू शकतो. करियरमध्ये उत्तम संधी मिळणार आहे.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी शुक्राचा राशी बदल शुभ ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला सर्व भौतिक सुखं मिळू शकतात. परदेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. व्यवसायात मोठी कमाई करू शकता. अचानाक कुठून तरी तुमच्या हाती पैसा लागणार आहे. बिझनेसमध्ये मोठी डील होऊ शकते.

Shukra Gochar
Surya Grahan 2024: २ ऑक्टोबरपासून 'या' राशींच्या आयुष्यावर लागणार ग्रहण; 'या' राशींवर घोंगावणार संकट

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com