Surya Grahan 2024: २ ऑक्टोबरपासून 'या' राशींच्या आयुष्यावर लागणार ग्रहण; 'या' राशींवर घोंगावणार संकट

Surya Grahan 2024 Rashifal : सूर्य आणि शनीचा षडाष्टक योग तयार होणार आहे. हा योग देखील अशुभ मानला जातोय. जाणून घेऊया या काळात कोणत्या व्यक्तींना अधिक सावध राहिलं पाहिजे.
Surya Grahan 2024
Surya Grahan 2024saam tv
Published On

पितृ पक्ष सध्या सुरु असून २ ऑक्टोबर रोजी पितृ अमावसेच्या दिवशी हा समाप्त होणार आहे. दरम्यान यंदाच्या पितृ पक्षाला सूर्य ग्रहण लागणार आहे. पितृ अमावस्येच्या दिवशी लागणार सूर्य ग्रहण अशुभ मानलं जातं. या दिवशी सूर्य आणि शनीचा षडाष्टक योग तयार होणार आहे. हा योग देखील अशुभ मानला जातोय.

शनि-सूर्य आणि सूर्यग्रहण यांच्यामुळे षडाष्टक योग तयार होणार असून या काळात काही राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे. यावेळी काही व्यक्तींची धनहानी होऊ शकते किंवा काही राशींना अचानक आरोग्याची कमतरता जाणवू शकते. जाणून घेऊया या काळात कोणत्या व्यक्तींना अधिक सावध राहिलं पाहिजे.

मेष रास

पुढील १५ दिवस मेष राशीच्या लोकांवर ग्रहणाची अशुभ छाया राहणार आहे. या लोकांना आर्थिक नुकसान होऊ शकते. आर्थिक जीवनात चढ-उतार पाहावे लागणार आहे. काही आजार किंवा अपघाताला बळी पडू शकता.

Surya Grahan 2024
Gajkesari Yog: दिवाळीपूर्वी गुरु-चंद्र बनवणार गजकेसरी राजयोग; 'या' राशींचा होणार भाग्योदय

मिथुन रास

हे सूर्यग्रहण आणि शनि आणि सूर्याचा षडाष्टक योग मिथुन राशीच्या लोकांसाठी अडचणी वाढवणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे वाद होऊ शकतात. जीवनात तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. तुम्ही नकारात्मक विचाराने वेढले असणार आहात.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांनी ग्रहणाच्या दिवसापासून १५ दिवस काळजी घ्यावी. आर्थिक स्थितीत बदल होणार असून पैशांची चणचण भासणार आहे. या काळात कर्ज किंवा कर्ज न देणं तुमच्या फायद्याचं ठरू शकतं.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहणानंतरचे १५ दिवस कठीण असणार आहेत. तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. व्यावसायिकांनी कोणताही निर्णय घेऊ देऊ नका. वाहन चालवताना काळजी घ्या.

Surya Grahan 2024
Trigrahi Yog : ५० वर्षांनंतर कन्या राशीत बनला त्रिग्रही राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकणार

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com