Guru Budh Yuti saam tv
राशिभविष्य

Mangal-Budh Yuti: मकर संक्रातीनंतर होणार मंगळ-बुधाची होणार युती; या राशींच्या नशीबी येणार पैसाच पैसा

Mars And Budh Conjunction In Makar: मकर संक्रांतीनंतर ग्रहस्थितीत मोठा बदल होणार आहे. मंगळ आणि बुध यांची युती काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या युतीमुळे आर्थिक लाभ, संपत्ती वाढ आणि करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाचा संबंध वाणी, व्यवसाय, बुद्धिमत्ता, अर्थव्यवस्था, तर्क आणि शेअर बाजाराशी असतो. मंगळाला धैर्य, शौर्य, शौर्य, संपत्ती आणि क्रोध यांचाही कारक मानण्यात येतं.

१७ जानेवारी रोजी पृथ्वीचा पुत्र मंगळ आणि वाणीचा कारक बुध यांची युती शनीच्या मकर राशीत होणार आहे. यामुळे काही राशींसाठी सुवर्णयुगाची सुरुवात होऊ शकणार आहे. यामुळे काही राशींच्या व्यक्तींना नव्याने संधी मिळणार आहे. यामध्ये कोणत्या राशींना लाभ होऊ शकतो ते पाहूयात.

तूळ रास

मंगळ आणि बुध यांचा युती तूळ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकणार आहे. ही युती तुमच्या राशीच्या संपत्ती आणि आनंद क्षेत्रात होणार आहे. गाडी किंवा संपत्ती खरेदी करू शकता. या काळात करिअरमध्ये प्रगती होणं शक्य आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकणार आहे.

सिंह रास

मंगळ आणि बुध यांची दुर्मिळ युती तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकणार आहे. ही युती तुमच्या राशीच्या तिसऱ्या घरात असणार आहे. या काळात तुमचं धैर्य आणि शौर्य वाढू शकणार आहे. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. परदेश प्रवासाच्या संधी मिळण्याची शक्यता आहेत.

मकर रास

मंगळ आणि बुध ग्रहाची युती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. ही युती तुमच्या राशीच्या लग्नाच्या घरात तयार होणार आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकणार आहे. त्यांना पगारवाढीचा आनंदही अनुभवता येणार आहे. कामावर तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या देखील मिळू शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT