Shadgrahi Yoga saam tv
राशिभविष्य

Shadgrahi Yoga 2025: 57 वर्षांनी षडग्रही योग 'या' राशींना करणार मालामाल; 29 मार्चपासून घरात येणार पैसाच पैसा

Six Planets Auspicious Yog in Pisces : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मार्च महिन्यात मीन राशीत ग्रहांचा अद्भुत संयोग निर्माण होणार आहे. या महिन्यात राहू आणि शुक्र आधीपासूनच मीन राशीत स्थित आहेत. त्यातच २९ मार्चला शनी देखील या राशीत प्रवेश करणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रानुसार, वेळोवेळी ग्रह इतर ग्रहांशी युती करतात. ग्रहांच्या या युतीचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर आणि जीवनावर होत असतो. येत्या काळात म्हणजेच ४ दिवसांनी मीन राशीत ६ ग्रह एकत्र येऊन एक दुर्मिळ योगायोग निर्माण करणार आहेत. याचा परिणामही सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे.

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, मार्चमध्ये राहू आणि शुक्र आधीच मीन राशीत भ्रमण करतायत. २९ मार्च रोजी शनि मीन राशीतही प्रवेश करणार आहे. फेब्रुवारीमध्ये बुध ग्रहही मीन राशीत भ्रमण करतोय आहे. तर दुसरीकडे मार्चपासून सूर्य मीन राशीत भ्रमण करतायत. यापूर्वी २८ मार्च रोजी चंद्र मीन राशीत देखील प्रवेश करणार आहे.

२९ मार्च रोजी ६ ग्रह मीन राशीत असणार आहेत. अशा परिस्थितीत सहा ग्रहांच्या युतीने काही राशींचे चांगले दिवस सुरू होणार आहेत. या राशींच्या उत्पन्नात वाढ होऊ शकणार आहे. यावेळी नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळू शकणार आहे. तर अविवाहित व्यक्तींना चांगली बातमी मिळणार आहे.

सिंह रास

षडग्रही योग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. कारण हा योग तुमच्या राशीच्या आठव्या घरात तयार होणार आहे. या वेळी नोकरीत पदोन्नतीच्या संधी असणार आहेत. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचं कौतुक होणार आहे. नवीन करार आणि करारांमुळे व्यापाऱ्यांना प्रचंड फायदा होणार आहे. या काळात तुमचं उत्पन्न वाढू शकते.

धनु रास

षडग्रही योगाची निर्मिती तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकणार आहे. हा योग तुमच्या गोचर कुंडलीच्या चौथ्या घरात तयार होणार आहे. यावेळी नोकरदारांसाठी पगारवाढीची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात प्रेम आणि सुसंवाद वाढणार आहे. या काळात तुमचे दैनंदिन उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.

मकर रास

षडग्रही योगाची निर्मिती तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. तुमचं धैर्य आणि शौर्य वाढू शकणार आहे. व्यावसायिकांना मोठा नफा मिळू शकणार आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीच्या संधी मिळणार आहेत.म्ही देशात आणि परदेशात प्रवास करू शकता.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : जळगावच्या मानाच्या गणपतीचे विसर्जन; महापौरांसह जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी केली आरती

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सोनं-चांदीच्या किंमती मोठा बदल, जाणून घ्या २४ , २२ आणि १८ कॅरेटचा भाव

Palak Tikki For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी घरीच बनवा पालक टिक्की, सोपी आहे रेसिपी

LPG Gas Cylinder : ग्राहकांसाठी मोठी बातमी! वर्षाला ६ सिलिंडर मिळणार मोफत; कुठे आणि कोणासाठी लागू केला आहे हा निर्णय? वाचा

वर्षांपूर्वी रस्ता बांधताना आक्षेप घेतला नाही म्हणून भरपाई नाकारता येईल का? उच्च न्यायालयाने स्पष्टच सांगितलं...

SCROLL FOR NEXT