Viprit Rajyog saam tv
राशिभविष्य

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Viprit Rajyog 2025: ग्रहांचे गोचर आणि त्यांच्या विशिष्ट संयोगामुळे अनेक शुभ-अशुभ योग तयार होतात, जे मानवी जीवनावर थेट परिणाम करतात. या योगांमध्ये 'राजयोग' अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. असाच एक दुर्मिळ आणि शक्तिशाली योग म्हणजे 'विपरीत राजयोग'

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रात नवग्रहात शुक्राला खूप महत्त्व देण्यात आलेलं आहे. शुक्राच्या गोचरामुळे अनेक क्षेत्रांत लाभ होऊ शकणार आहे. जुलै महिन्यात शुक्राचं गोचर होत असल्याने अनेक राशींना भाग्यप्राप्ती होऊ शकते. धन, ऐश्वर्य आणि सुखाचा कारक गुरु शुक्र या राक्षसाने 29 जून रोजी वृषभ राशीत प्रवेश केला आहे. 26 जुलैपर्यंत तो या राशीत राहणार आहे.

शुक्राने स्वत:च्या राशीत येऊन मालव्य राजयोगाची निर्मिती केली आहे. याशिवाय शुक्राने तुळ राशीत विपरीत राजयोगही तयार केला आहे. ज्यामुळे काही राशीच्या जातकांना विशेष लाभ मिळू शकणार आहे. तुळ राशीच्या कुंडलीत शुक्र हा लग्नाचा स्वामी असून अष्टमात राजयोग होतोय. शुक्राविरुद्ध राजयोग केल्याने कोणत्या राशींना बंपर लाभ मिळण्याची शक्यता आहे ते पाहूयात.

तूळ रास

शुक्र ग्रह आठव्या घरात विपरीत राजयोग निर्माण करतोय. यावेळी शुक्रची दृष्टी कुंडलीच्या धनभावावर पडतेय. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. शुक्र हा संपत्तीचा ग्रह आहे. भौतिक, मानसिक किंवा शारीरिक आनंद मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला आरोग्याच्या समस्या असतील किंवा घरात संपत्ती असूनही कलह होतील.

कुंभ रास

या राशीच्या लोकांसाठी विपरीत राजयोग भाग्यवान ठरू शकणार आहे. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकणार आहे. राजकारणाशी संबंधित लोकांना सार्वजनिक पाठिंबा मिळू शकतो. घरात शुभ किंवा धार्मिक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. काही काळापासून कामाच्या ठिकाणी समस्या येत असतील तर तुम्ही त्यातून सुटका मिळवू शकतात.

कर्क रास

या राशीत, शुक्र हा चौथ्या घराचा स्वामी आहे आणि अकराव्या घरात गोचर करतोय. चौथं घर सुखाचं आहे आणि अकरावे घर धनाचं आहे. या राजयोगामुळे या राशीच्या लोकांच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकणार आहेत. तुम्ही तुमच्या आईसोबत चांगला वेळ घालवू शकणार आहात. आईचे आरोग्य सुधारण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत अग्नितांडव! जोगेश्वरीमध्ये इमारतीला भीषण आग, काही जण अडकले; परिसरात पसरले धुराचे लोट| VIDEO

Bhaubeej 2025 Muhurat: भाऊबीजेला तुमच्या भावाला औक्षण करताना या छोट्या चुका टाळा, शुभ वेळ आणि योग्य दिशा जाणून घ्या

Vasai Fort Photo Shoot : शिवरायांच्या पोषाखात फोटोशूट करताना रोखलं, वसई किल्ल्यावरील परप्रांतीय सुरक्षारक्षकाला मराठी तरुणाने शिकवला धडा; VIDEO चर्चेत

Parineeti Chopra: 'सगळ्यात बेस्ट आईला...', राघव चड्ढा यांनी परिणीती चोप्राला खास स्टाईलमध्ये वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

Bhau beej History: बहिण भावाच्या नात्याचा सण 'भाऊबीज' 'दिवाळीत का साजरा केला जातो? कारण कोणालाच माहित नाही

SCROLL FOR NEXT