Shani Vakri: श्रावणापूर्वी न्यायाधीश शनी होणार वक्री; 'या' राशींवर कोसळणार दुःखाचा डोंगर, आर्थिक अडचणीही येणार

Shani Vakri 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे गोचर आणि त्यांची वक्री स्थिती मानवी जीवनावर मोठा प्रभाव टाकते. न्यायदेवता शनिदेव हे त्यांच्या कर्माचे फळ देणारे ग्रह मानले जातात.
Shani Gochar
Shani Gocharsaam tv
Published On

दर महिन्याला कोणते ना कोणते ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. जुलै महिना सुरु झाला असून या महिन्यात देखील अनेक ग्रह त्यांच्या स्थितीत बदल करणार आहेत. जुलै महिना ग्रहांच्या स्थितीनुसार खूप खास असणार आहे. या महिन्यात कर्माचा कर्ता शनी देखील आपली स्थिती बदलणार आहे. दरम्यान शनीच्या स्थिती बदलाचा परिणाम सर्व राशींवर दिसून येणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, या महिन्याच्या सुरुवातीला शनी मीन राशीत वक्री होणार आहे.

शनीची वक्री गती काही राशींच्या जीवनावर नकारात्मक परिणाम करू शकणार आहे. वक्री गतीमध्ये शनी सर्वात शक्तिशाली असून ज्या राशींच्या जीवनात शनी साडेसाती आहे, त्यांच्यावर शनीचा वक्री होण्याचा नकारात्मक प्रभाव कमी होतो. परंतु काही राशी अशा आहेत ज्यांना शनीच्या वक्रीमुळे सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. यावेळी कोणच्या राशींना सावध राहावं लागणार आहे ते पाहूयात.

Shani Gochar
Guru Gochar: तूळ राशीसह ३ राशी आतापासूनच साजरी करणार दिवाळी; अतिचारी गुरु देणार पैसा; घरी येणार लक्ष्मी

वृषभ रास

शनीच्या वक्री हालचालीमुळे या राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. या काळात विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यावं लागेल. आर्थिक परिस्थितीत काही समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. अनावश्यक खर्च टाळला पाहिजे. तुमच्या खाण्यापिण्याची आणि जीवनशैलीची काळजी घ्या.

कर्क रास

शनीच्या वक्री गतीमुळे या राशीच्या लोकांसाठी काही समस्या निर्माण होऊ शकतात. तुम्हाला अनावश्यक खर्चाचा त्रास होऊ शकतो. तुम्हाला थोडं सावध राहण्याची गरज आहे. शनीच्या वक्री गतीमुळे धार्मिक कार्यात काही समस्या उद्भवू शकतात. स्वतःच्या कामात लक्ष द्या आणि दुसऱ्याच्या वाईट बोलण्यात किंवा वादात अडकण्याचा प्रयत्न करू नका.

Shani Gochar
Weekly Horoscope: आठवड्यात 'या' राशींना शेअर्समध्ये नुकसान होण्याची शक्यता; पाहा तुमचं साप्ताहिक राशीभविष्य

मीन रास

या राशीत जन्मलेल्या लोकांनीही थोडं सावध राहावं. तुमच्या जोडीदाराशी एखाद्या मुद्द्यावरून वाद होऊ शकतो. तुमचे नातं तुटण्याची यावेळी शक्यता आहे. तुमच्या आहाराची विशेष काळजी घ्या. आळस तुमच्यावर वर्चस्व गाजवू शकतो. कोर्टाच्या प्रकरणांमध्ये तुम्ही फसण्याची शक्यता आहे.

Shani Gochar
Guru-Shani transit: 500 वर्षांनंतर श्रावणात बनणार शनी-गुरुचा दुर्लभ संयोग; 'या' 3 राशींचे येणार अच्छे दिन

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com