Weekly Horoscope: आठवड्यात 'या' राशींना शेअर्समध्ये नुकसान होण्याची शक्यता; पाहा तुमचं साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope: कोणत्याही आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य हे ज्योतिषशास्त्रावर आधारित असते. यात ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या स्थितीनुसार आणि त्यांच्या राशीतील बदलांनुसार प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर काय परिणाम होईल, याचा अंदाज वर्तवला जातो.
Horoscope
Horoscope in Marathisaam tv
Published On

मेष

धनस्थानातील शुक्राचे आगमन मोठे आर्थिक लाभ देणारे असून उत्पन्नात वाढ होईल. कुटुंबात आनंददायक वातावरण राहील. शेअर्ससारख्या व्यवसायात नुकसान संभवते.

वृषभ

प्रवास, मनोरंजन, संगीत यांचा आनंद घ्याल. मात्र, सप्ताहाच्या सुरवातीला घरातील वातावरण गरम राहील. घर, जागेच्या कामात कटकटी होतील. उत्तरार्थात मुलांकडून मनस्ताप संभवतो.

मिथुन

मोठ्या प्रवासासाठी अनुकूल काळ असून, परदेशात जाण्याची संधी मिळेल. उंची वस्तू, वस्त्र, अलंकार व कुटुंबासाठी मोठे खर्च होतील. कर्तृत्व सिद्ध होईल. सप्ताहात भावंडांशी मतभेद टाळावेत.

कर्क

मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन ओळखी होतील. स्त्री वर्गाकडून फायदा होईल. आर्थिक जबाबदारी वाढेल. मुलांसाठी खर्च होतील. छोटे प्रवास जपून करावेत.

Horoscope
Surya-Guru Yuti: 12 वर्षांनंतर होणार गुरु-सूर्याची युती; 'या' राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु

सिंह

दशमातील शुक्राचे आगमन नोकरी व्यवसायाला यश देणारे राहील. सप्ताहाच्या सुरुवातीला रागावर नियंत्रण ठेवावे. चिडचिड होईल, उत्तरार्थात कौटुंबिक चिंता राहील.

कन्या

भाग्यातील शुक्राचे आगमन तीर्थयात्रा, प्रवास घडविणारे राहील. प्रसिद्धी, नावलौकीक मिळेल. धार्मिक मंगलकार्य घडतील. गुरूजनांचा सहवास लाभेल.

तूळ

अष्टमातील शुक्राचे भ्रमण वारसा हक्क, कमी श्रमातून फायदा देणारे राहील. विमा, पेन्शनची कामे होतील. मात्र आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

वृश्चिक

सप्ताहातील शुक्राचे भ्रमण तरुणांचे विवाह जमण्यासाठी अनुकूल राहील. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. भागीदारीतील व्यवसायाला फायदा होईल. उत्तरार्धात मित्र-सहकारी यांच्यात समज-गैरसमज होतील.

धनू

नोकरीमध्ये चांगले बदल घडविणारा काळ आहे. वेतनवाढ, उत्पन्नात वाढ होईल. नवीन नोकरीची संधी मिळेल. सप्ताहात धार्मिक कार्यात अडथळे संभवतात.

मकर

पंचमातील शुक्राचे आगमन मुलांकडून आनंद देणारे राहील. शेअर्ससारख्या व्यवसायात मोठा फायदा होईल. तरुणांना प्रेमप्रकरणात यश मिळेल. भावंडांकडून मनस्ताप होईल.

Horoscope
Surya-Budh Yuti: 12 महिन्यांनी चंद्राच्या राशीत होणार सूर्य-बुधाची युती; 'या' राशींना मिळणार अचानक पैसे

कुंभ

घरी प्रॉपर्टी खरेदी-विक्रीसाठी अनुकूल काळ राहील. मात्र जोडीदाराशी वादविवाद टाळावेत. कोर्टकचेरीमध्ये त्रास संभवतो. भागीदारीच्या व्यवसायात कटकटी होतील. उत्तरार्धात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

मीन

भावंडे, नातेवाईकांचे विवाह जमतील. आनंदाची बातमी कळेल. हितशत्रूवर विजय मिळेल. मात्र नोकरीमध्ये कटकटी, बदली किंवा बदलीचे योग संभवतात. जोडीदाराशी समज-गैरसमज होतील.

Horoscope
Shukrawar Upay: घरातून नकारात्मकता होईल दूर; शुक्रवारच्या दिवशी करा हे सोपे उपाय

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com