Shukraditya Rajyog saam tv
राशिभविष्य

Shukraditya Rajyog: 365 दिवसांनंतर गुरुच्या राशीत बनणार शुक्रादित्य योग; 'या' राशींच्या घरी सोनपावलांनी लक्ष्मी येणार घरी

Shukraditya Rajyog On Dhanu 2025: ज्योतिषशास्त्रानुसार पुढील ३६५ दिवसांनंतर गुरु राशीत एक विशेष शुक्रादित्य योग निर्माण होणार आहे. या योगामुळे काही राशींवर लक्ष्मीदेवीची कृपा राहणार असून सुवर्ण पावलांनी घरात समृद्धीचे आगमन होईल, असे ज्योतिषांनी सांगितले आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषानुसार ग्रहांचा राजा सूर्यदेव दर महिन्याला राशी परिवर्तन करतात. याचा परिणाम 12 राशींवर तर होतोच, पण देश-विदेशातही दिसून येतो. डिसेंबर महिन्याच्या शेवटी सूर्य धनु राशीत प्रवेश करणार आहे. 14 जानेवारी 2026 पर्यंत म्हणजे मकर संक्रांतीपर्यंत या राशीत राहतणार आहे. या काळात सूर्याची एखाद्या ग्रहासोबत युती होण्याची शक्यता आहे.

20 डिसेंबर रोजी सूर्याची युती शुक्रासोबत होणार आहे. तर याच दिवशी शुक्रही धनु राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत सूर्य-शुक्राच्या युतीमुळे शुक्रादित्य राजयोग तयार होणार आहे. या राजयोगाचा परिणाम सर्व राशींवर दिसून येणार आहे. मात्र तीन राशींसाठी हा काळ विशेष लाभदायी ठरणार असून त्यांना अपार यश, संपत्ती आणि कीर्ती मिळू शकते.

तूळ रास (Libra Zodiac)

तूळ राशींच्य व्यक्तींसाठी शुक्रादित्य राजयोग सुख-सुविधा आणि भौतिक आनंद वाढवणारा ठरणार आहे. संतानाकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. मानसिक आणि शारीरिक शांती मिळू शकणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ उत्तम ठरू शकतो. कुटुंबासोबत आनंदी वेळ घालवाल.

मिथुन रास

मिथुन राशीच्या जातकांसाठी सूर्य-शुक्राची युती अत्यंत लाभदायी ठरू शकणार आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांचे दीर्घकाळापासून अडकलेले काम पूर्ण होईल आणि धन-धान्यात वाढ होईल. यावेळी करिअरमध्ये मोठा फायदा होणार आहे. उच्च शिक्षणाचं तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकणार आहे. कौटुंबिक नातेसंबंध अधिक गोड होऊ शकणार आहेत.

सिंह रास (Leo Zodiac)

सिंह राशीसाठी शुक्रादित्य राजयोग अत्यंत लाभदायी ठरणार आहे. सूर्य आणि शुक्राच्या युतीने जीवनात सकारात्मक बदल दिसतील. सूर्य हा तुमच्या राशीचा स्वामी असल्याने भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होणार आहे. या काळात तुम्हाला पालकांचा पूर्ण पाठिंबा मिळणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आता बँक अकाउंटशिवाय करता येणार UPI पेमेंट; BHIM अ‍ॅपने लाँच केलं नवं फीचर

Gul Chinch Chutney Recipe : गुळ चिंचेची आंबट गोड चटणी, एकदा करुन बघाच

Shocking : हृदयद्रावक! वडिलांची नजर चुकवून ४ वर्षाचा शिवराज ट्रॅक्टरवर चढला, अचानक गिअर पडला अन् थेट...

Maharashtra Live News Update: महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी व हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन

Poet Death: महाराष्ट्राचा तेजस्वी तारा निखळला! सुप्रसिद्ध कवी यांचे निधन, मराठी साहित्यविश्वात शोककळा

SCROLL FOR NEXT