Navpancham Rajyog: 6 डिसेंबरपासून 'या' राशींना मिळणार नुसता पैसा; बुध ग्रह बनवणार पॉवरफुल योग

Navpancham Rajyog 2025: ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, तर्कशक्ती, व्यापार आणि धनाचा कारक मानला जातो. ६ डिसेंबर २०२५ रोजी बुध ग्रह आपले स्थान बदलून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे
Navpancham Rajyog
Navpancham Rajyogsaam tv
Published On

ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रह ठराविक कालावधीनंतर त्यांच्या राशीत किंवा स्थितीमध्ये बदल करतात. ज्यामुळे एखाद्या ग्रहासोबत युती किंवा दृष्टि तयार होऊ शकणार आहे. अशा कोणीय स्थितीत शुभ-अशुभ राजयोगांची निर्मिती होऊ शकणार आहे. देवगुरु बृहस्पती यांनी मे महिन्यात मिथुन राशीत प्रवेश केला होता. त्यानंतर ते अतिचारी गतीने पुढे सरकले. या गतीमुळे ते ऑक्टोबरपासून डिसेंबरच्या सुरुवातीपर्यंत कर्क राशीत आहेत. 5 डिसेंबर रोजी ते पुन्हा मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत.

गुरु मिथुन राशीत असताना त्याचा इतर ग्रहांसोबत युती किंवा संयोग होणार आहे. त्याचप्रमाणे गुरु बृहस्पती मिथुन राशीत प्रवेश केल्यानंतरच्या दुसर्‍या दिवशी तुला राशीत स्थित बुधासोबत संयोग करून नवपंचम राजयोग तयार होणार आहे. या योगामुळे काही राशींच्या व्यक्तींना विशेष लाभ मिळू शकणार आहे.

Navpancham Rajyog
Guru Aditya Rajyog: गुरु पौर्णिमेच्या दिवशी बनला ‘गुरु आदित्य राजयोग’, 'या' राशींना बिझनेसमधून मिळणार पैसाच पैसा

कर्क रास (Cancer Zodiac)

या राशीच्या बाराव्या भावात गुरु बृहस्पती विराजमान असणार आहे. कर्क राशीच्या जातकांना विशेष फळांची प्राप्ती होऊ शकते. अनेक क्षेत्रांत लाभ मिळेल. जुनी कामे पूर्ण होतील. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा काळ लाभदायी ठरणार आहे. व्यापारात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. आत्मचिंतनातून स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवू शकाल.

Navpancham Rajyog
Navpancham Rajyog: 30 वर्षांनंतर शनी बनवणार नवपंचम राजयोग, 'या' राशींना मिळू शकणार भरपूर धन संपत्ती

तूळ रास (Libra Zodiac)

तूळ राशीच्या जातकांसाठी गुरु-बुधाचा नवपंचम राजयोग अत्यंत लाभदायी ठरू शकणार आहे. नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. करिअरमध्ये परदेशात नोकरी मिळण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. अधिक यशासोबत प्रसिद्धी मिळू शकणार आहे. मेहनतीचे फळ नक्की मिळेल.

Navpancham Rajyog
Navpancham Rajyog: 30 वर्षांनंतर शनी बनवणार नवपंचम राजयोग, 'या' राशींना मिळू शकणार भरपूर धन संपत्ती

सिंह रास (Leo Zodiac)

सिंह राशीच्या जातकांसाठीही गुरु-बुधाचा नवपंचम राजयोग अनुकूल ठरणार आहे. तुमच्या गोचर कुंडलीत बुध चौथ्या भावात आणि गुरु अकराव्या भावात असणार आहे. कुटुंबासोबत आनंदी वेळ घालवू शकणार आहात. व्यापारात अपार यश आणि चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक व्यवसायातही यश मिळण्याचे योग आहेत. आर्थिक स्थिती मजबूत राहील.

Navpancham Rajyog
Gajkesari Rajyog: 12 वर्षांनंतर बनणार गजकेसरी राजयोग; चंद्र-गुरूच्या कृपेने मिळणार भरघोस पैसा

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com