Navpancham Rajyog: 30 वर्षांनंतर शनी बनवणार नवपंचम राजयोग, 'या' राशींना मिळू शकणार भरपूर धन संपत्ती

Navpancham Rajyog 2025: जवळपास ३० वर्षांनंतर शनी एक अतिशय दुर्मिळ आणि शुभ योग तयार करत आहे, ज्याचे नाव 'नवपंचम राजयोग' आहे. हा योग खूप शक्तिशाली मानला जातो
Navpancham Rajyog
Navpancham Rajyogsaam tv
Published On

वैदिक ज्योतिषानुसार ग्रह आपल्या समयाप्रमाणे गोचर करताना इतर ग्रहांशी युती करतात. अशा युतींमुळे शुभ योग आणि राजयोगांची निर्मिती होत असते. सप्टेंबर महिन्यात तब्बल ३० वर्षांनंतर शनी आणि बुध यांचा नवपंचम राजयोग तयार होत आहे.

या योगामुळे काही राशींचे नशीब उजळणार असून करिअर, व्यवसाय आणि आर्थिक प्रगतीची दारे खुली होऊ शकतात. नवीन उत्पन्नाचे मार्ग मिळतील तर काहीं व्यवसायासाठी चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकणार आहेत. यावेळी कोणत्या राशींना जास्त लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

Navpancham Rajyog
Mahalakshmi Yog: उद्यापासून 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार; महालक्ष्मी योगामुळे होणार धनलाभ

कुंभ रास

कुंभ राशीच्या जातकांसाठी बुध-शनी नवपंचम राजयोग अत्यंत लाभदायी ठरू शकणार आहे. या काळात तुमची लोकप्रियता वाढू शकते. समाजात सन्मान आणि प्रतिष्ठा मिळणार आहे. व्यक्तिमत्त्व अधिक आकर्षक होईल. मोठ्या प्रतिष्ठित लोकांशी संबंध प्रस्थापित होतील, जे भविष्यात उपयुक्त ठरतील.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा योग प्रगतीचा मार्ग मोकळा करणारा असेल. करिअरमध्ये पदोन्नती, पगारवाढ किंवा व्यवसायात विस्ताराची संधी मिळू शकते. नवीन भागीदारांसोबत काम करण्याची व मोठ्या व्यावसायिक करारावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे. जुने गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल.

Navpancham Rajyog
Lakshmi Narayan Yog: 12 वर्षांनंतर शुक्र बनवणार लक्ष्मी नारायण राजयोग; 'या' राशींना होणार धनलाभ

वृषभ रास

वृषभ राशीसाठी हा नवपंचम राजयोग शुभ फलदायी ठरणार आहे. या काळात उत्पन्नात वाढ होईल आणि नवीन कमाईचे मार्ग खुलू शकणार आहेत. सामाजिक वर्तुळ वाढणार आहे. नवीन ओळखी होऊ शकतता. अचानक धनलाभ व नवीन संधी हातात येणार आहेत. प्रेमसंबंधात गोडवा टिकून राहणार आहे.

Navpancham Rajyog
Malavya Rajyog 2025: 50 वर्षांनंतर चमकणार 'या' राशींचं नशीब; मालव्य आणि बुधादित्य राजयोग मिळवून देणार धनलाभ

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com