Kendra Trikon Rajyog saam tv
राशिभविष्य

Kendra Trikona Rajyog: 30 वर्षांनंतर शनीने बनवला पॉवरफुल योग; 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा

Kendra Trikona Rajyog 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका निश्चित कालावधीनंतर आपल्या राशीत परत येतो. कर्मफलदाता शनि (Saturn) जवळपास ३० वर्षांनंतर आपल्या मूळ त्रिकोण राशीत प्रवेश करत आहे, ज्यामुळे एक अत्यंत शक्तिशाली 'शश राजयोग' (Shasha Rajyog) तयार होत आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना न्यायप्रिय, कर्मफळदाते, संयम, श्रम, सेवा, विलंब, तसंच धन आणि संपत्तीचे कारक मानलं जातं. शनी हा सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह आहे आणि त्यालाच साडेसाती आणि ढय्या देण्याचा अधिकार आहे. त्यामुळे शनी आपल्या कर्मांप्रमाणेच फळ देतात.

वैदिक ज्योतिषानुसार मार्च 2025 मध्ये शनी आपली मूळ त्रिकोण राशी कुंभ सोडून मीन राशीत गेले. जून 2027 पर्यंत ते या राशीत राहणार आहेत. सध्या शनी मीन राशीत वक्री अवस्थेत विराजमान असून या अवस्थेमुळे केंद्र-त्रिकोण राजयोग तयार झाला आहे. या योगाचा काही राशींवर विशेष अनुकूल परिणाम होणार आहे.

केंद्र-त्रिकोण योग म्हणजे काय?

केंद्र त्रिकोण योग तेव्हा तयार होतो जेव्हा कुंडलीतील केंद्र भाव (चतुर्थ, सप्तम, दशम) आणि त्रिकोण भाव एकमेकांशी युती, दृष्टि किंवा राशी बदल करून संबंध तयार करतात. सध्या शनी मिथुन राशीत भाग्यभावाचा स्वामी होऊन केंद्रात गोचर करत असल्याने हा विशेष योग तयार झाला आहे.

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या जातकांसाठी शनीचा केंद्र-त्रिकोण योग अनेक प्रकारे लाभदायक ठरू शकतो. या स्थितीमुळे व्यापार क्षेत्रात चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार असेल तर हा काळ अनुकूल आहे. भविष्यासाठी धनसंचय करण्यात यश मिळेल. शिक्षण क्षेत्रातही विद्यार्थ्यांना चांगले फळ मिळेल.

मकर राशी

मकर राशीसाठी शनी सध्या तृतीय भावात आहेत. त्यांची तिसरी दृष्टि पंचम भावावर, सातवी दृष्टि नवम भावावर आणि दहावी दृष्टि द्वादश भावावर पडत आहे. या राशीवरील साडेसाती संपलेली आहे, त्यामुळे हळूहळू जीवनात सकारात्मक बदल दिसतील. लांब काळापासून अडकलेले कामं पुन्हा सुरू होणार. अचानक धनलाभाचेही योग आहेत.

मीन राशी

मीन राशीच्या जातकांसाठी शनीचा केंद्र-त्रिकोण राजयोग अत्यंत शुभ ठरतो आहे. वक्री शनी सध्या लग्न भावात आहेत. त्यामुळे जीवनाच्या अनेक क्षेत्रांत मोठे यश मिळू शकतं. लांब काळापासून चालत असलेल्या समस्यांचे समाधान मिळू शकणार आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारणार आहे. संयम आणि योग्य नियोजनाने घेतलेले निर्णय तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zubeen Garg: जुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट; प्रसिद्ध संगीतकाराला अटक, मॅनेजरच्या घरावरही छापेमारी

Pune News : आजारी आजीला तरुणाने पाठीवर बसवून रुग्णालयात नेलं, ५ किमीपर्यंत पायपीट; पुणे जिल्ह्यातलं भयंकर वास्तव

Heart Disease: धक्कादायक! भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला अनुवांशिक घटकांच्या जोखीमेमुळे हृदयाच्या आजारांचा धोका

Maharashtra Live News Update: केळी पीक विम्याच्या लाभातील प्रशासकीय अडथळा अखेर दूर

Box Office: 'जॉली एलएलबी ३' आणि दशावतारमध्ये काटे की टक्कर; कोणी मारली बाजी तिकिट खिडकीवर बाजी?

SCROLL FOR NEXT