Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

Mangal And Mercury Conjunction In Libra: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे गोचर आणि त्यांच्या युतीचा (Conjunction) मानवी जीवनावर मोठा परिणाम होतो. बुध ग्रह बुद्धिमत्ता आणि वाणीचा कारक आहे, तर मंगळ ग्रह ऊर्जा, साहस आणि भूमीचा कारक आहे. सुमारे १८ वर्षांनी या दोन महत्त्वाच्या ग्रहांची युती होत आहे.
Budh Shukra Yuti
Budh Shukra Yutisaam tv
Published On

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह हा व्यापार, बुद्धी, वाणी आणि अर्थव्यवस्थेचा कारक मानला जातो. तर मंगल ग्रह साहस, पराक्रम आणि भूमीचा अधिपती मानला जातो. येत्या ऑक्टोबर महिन्यात तुला राशीत बुध आणि मंगळाची युती होणार आहे.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, या युतीचा परिणाम सर्व राशींवर होणार असला तरी ३ राशींवर विशेष कृपा होणार आहे. यावेळी काही राशींच्या आयुष्यात सुखाचे क्षण येणार आहेत. या काळात काहींना अचानक धनलाभ होईल. तर काहींना उधारीचे पैसे परत मिळतील. यामध्ये कोणत्या राशींना चांगला परिणाम मिळणार आहे ते पाहूयात.

Budh Shukra Yuti
Anant Chaturdashi 2023 : निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी! मूर्तीचे विसर्जन करताना या गोष्टी लक्षात ठेवा

कन्या राशी

कन्या राशीसाठी बुध मंगळाची युती अत्यंत शुभ परिणाम देणारी ठरणार आहे. ही युती तुमच्या कुंडलीच्या दुसऱ्या भावात होत असल्याने अचानक धनलाभाचे योग निर्माण होणार आहे. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढण्याची शक्यता आहे.

Budh Shukra Yuti
Shani Purnima 2025: यंदाच्या वर्षीची शनी पौर्णिमा ठरणार खास; वाचा शुभ मुहूर्त आणि पुजेची विधी

कर्क राशी

कर्क राशीसाठीही ही युती अनुकूल ठरणार आहे. कारण ही युती तुमच्या चौथ्या भावात होत आहे. या काळात तुम्हाला भौतिक सुखांची प्राप्ती होईल. आरोग्य चांगले राहिल्यामुळे तुम्ही प्रत्येक काम आत्मविश्वासाने करू शकाल. जर तुमचा व्यवसाय रिअल इस्टेट, प्रॉपर्टी किंवा जमिनीशी संबंधित असेल तर मोठा नफा होण्याची शक्यता आहे. घरगुती आनंद आणि आर्थिक स्थैर्य दोन्ही गोष्टी वाढतील.

Budh Shukra Yuti
Ganesh Chaturthi 2025: चतुर्थीला कधी आहे गणेश स्थापनेचा मुहूर्त? जाणून घ्या स्थापनेची योग्य विधी

मकर राशी

मकर राशीसाठी बुध–मंगळाची युती कर्मभावात होत आहे, त्यामुळे ही वेळ तुमच्या करिअरसाठी अत्यंत फलदायी ठरेल. नोकरीत प्रगती, व्यवसायात वाढ आणि मोठ्या जबाबदाऱ्या मिळण्याचे योग दिसत आहेत. या काळात तुमच्या प्रयत्नांना योग्य साथ मिळेल. दूरच्या प्रवासातून फायदा होणार आहे.

Budh Shukra Yuti
Ganesh Visarjan: अनंत चतुर्दशीला बाप्पाच्या विसर्जनासाठी आहेत 'हे' ५ मुहूर्त; जाणून घ्या योग्य विधी

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com