Viprit Rajyog saam tv
राशिभविष्य

Vipreet Rajyog: 18 वर्षांनी बुध ग्रहाने तयार केला विपरीत राजयोग; लक्ष्मीच्या कृपेने ३ राशींचा बँक बॅलन्स झपाट्याने वाढणार

Vipreet Rajyog 2025: तब्बल १८ वर्षांनंतर बुद्धी, वाणी आणि व्यापाराचा कारक असलेला बुध ग्रह अत्यंत दुर्मिळ आणि शुभ मानला जाणारा 'विपरीत राजयोग' तयार केला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजकुमार म्हणून बुध ग्रहाला संबोधलं जातं. बुध ग्रह हा दुसरा असा ग्रह आहे जो सर्वात वेगाने त्याच्या राशीमध्ये बदल करतो. सध्या बुध वृश्चिक राशीत मंगळासोबत विराजमान आहे. मुख्य म्हणजे हे दोन्ही ग्रह अस्त अवस्थेत आहेत. दोन्ही ग्रहांच्या अस्त अवस्थेत काही भावांमध्ये त्यांच्या संयोगातून विपरीत राजयोग तयार होणार आहेत. हा योग नोकरी करणाऱ्यांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी अत्यंत लाभदायी ठरू शकतो.

मंगळ आणि बुधाच्या संयोगातून तयार झालेला हा शक्तिशाली योग काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे. बुध 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5:53 वाजता वृश्चिक राशीत अस्त झाला. या राजयोगाच्या निर्मितीमुळे कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

मेष रास (Mesh Zodiac)

मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा योग अत्यंत लाभदायी ठरू शकणार आहे. मंगळ आणि बुधाची युती होऊन विपरीत राजयोग तयार झालाय. दोन्ही ग्रह अस्त अवस्थेत असले तरी या काळात आकस्मिक धनलाभ होऊ शकतो. कुटुंबासोबत आनंदी वेळ घालवता येईल. अहंकारातून मुक्ती मिळेल.

कन्या रास (Kanya Zodiac)

कन्या राशीच्या तिसऱ्या भावात विपरीत राजयोग तयार होणार आहे. बुध मंगळ युती या राशीच्या जातकांसाठी अत्यंत लाभदायी ठरू शकणार आहे. करिअरमध्ये दीर्घकाळापासून केलेल्या प्रयत्नांना यश मिळणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. शत्रूंवर विजय मिळवू शकणार आहात.

धनु रास (Dhanu Zodiac)

धनु राशीच्या व्यक्तींसाठी हा योग अत्यंत अनुकूल ठरू शकणार आहे. या राशीच्या बाराव्या भावात विपरीत राजयोग तयार होतोय. बुध–मंगळाच्या कृपेने मान–सन्मान, पद–प्रतिष्ठा मिळू शकणार आहे. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात लाभ मिळण्याची शक्यता आहे. जीवनात आनंदाचे वातावरण राहणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT