Mahalakshmi Rajyog astrology 2026 Saam Tv
राशिभविष्य

Mahalakshmi Rajyog: 18 महिन्यांनी मंगळ-चंद्र बनवणार महालक्ष्मी राजयोग; नव्या वर्षात या राशींची नोकरी-व्यवसायात होणार भरभराट

Mahalakshmi Rajyog astrology 2026: ज्योतिषशास्त्रानुसार १८ महिन्यांनंतर मंगळ आणि चंद्र ग्रहांचा संयोग होऊन महालक्ष्मी राजयोग निर्माण होणार आहे. हा योग अत्यंत शुभ मानला जातो आणि काही राशींना यामुळे नोकरीत प्रगती, व्यवसायात यश आणि आर्थिक लाभ मिळणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

२०२६ या नववर्षाला सुरुवात झाली असून या वर्षात अनेक दुर्मिळ आणि शुभ राजयोगांची निर्मिती होणार आहे. या राजयोगांचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे. १६ जानेवारी रोजी ग्रह अधिपती मंगळ मकर राशीत प्रवेश करणार आहे. शिवाय, १८ जानेवारी रोजी मनाचा कारक चंद्र, या राशीत गोचर करणार आहे.

मंगळ आणि चंद्राच्या युतीमुळे अत्यंत शुभ असा महालक्ष्मी राजयोग निर्माण होणार आहे. महालक्ष्मी राजयोगाची निर्मिती काही राशींसाठी शुभ सुरुवात असू शकणार आहे. यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ मिळण्याची शक्यता आहे ते पाहूयात.

वृषभ रास

महालक्ष्मी राजयोगामुळे वृषभ राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस येऊ शकणार आहे. या काळात तुम्हाला भाग्य अनुकूल राहणार आहे. या काळात तुम्ही कामासाठी किंवा व्यवसायासाठी प्रवास देखील करू शकता. या काळात धार्मिक कार्यात तुमची आवड वाढणार आहे.

मकर रास

महालक्ष्मी राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. हा राजयोग तुमच्या राशीच्या लग्नाच्या घरात तयार होणार आहे. तुमचे धैर्य आणि शौर्य देखील वाढणार आहे. तुमची सर्जनशीलता आणि बुद्धिमत्ता कामाच्या ठिकाणी प्रशंसा मिळवणार आहे. तुम्हाला मानसिक शांती देखील मिळणार आहे. विवाहित जोडप्यांनाही एक अद्भुत वैवाहिक जीवन अनुभवायला मिळू शकणार आहे.

मेष रास

महालक्ष्मी राजयोग तुमच्यासाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ ठरू शकणार आहे. या वर्षी तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात चांगली प्रगती दिसू शकते. बेरोजगार लोकांनाही नोकरी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा नवीन करार, भागीदारी आणि नफ्याचा काळ असणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pandharpur Accident : पंढरपूर-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; डोंबिवलीच्या ४ भाविकांचा मृत्यू, ८ गंभीर

Toor Dal Recipe: गरमागरम भाताबरोबर फोडणीचे वरण कसे बनवायचे? ही आहे सोपी रेसिपी

Jio 5G New Recharge: Jio चा स्वस्त प्लान, 200 रूपयांत Unlimited 5G Data, लगेचच घ्या जाणून

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्गमध्ये ठाकरेंच्या शिवसेनाला धक्का, भाजपाचे प्रमोद रावराणे बिनविरोध विजयी

Varun Dhawan: वरुण धवनला मेट्रोमध्ये स्टंट करणं पडलं माहागात; ट्रोलर्स म्हणाले, 'जिथे जाईल तिथे अपमान...'

SCROLL FOR NEXT