Budh Shukra Yuti saam tv
राशिभविष्य

Mangal-Budh Yuti: मंगळ-बुध ग्रहाची होणार महायुती; 'या' राशींची तिजोरी तुडुंब भरणार

Mars And Budh Conjunction In Makar: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहयोगांचा मानवी जीवनावर मोठा परिणाम होतो. लवकरच मंगळ आणि बुध यांचा महायोग होणार आहे. या ग्रहयोगामुळे काही राशींना अपार संपत्ती, धनलाभ आणि भाग्याची साथ मिळणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह हा वाणी, व्यापार, अर्थव्यवस्था, तर्कशक्ती, बँकिंग, गणित आणि शेअर बाजाराचा कारक मानला जातो. तर मंगळ ग्रह हा साहस, पराक्रम, शौर्य, वीरता, मालमत्ता आणि क्रोधाचा कारक मानला जातो.

पुढच्या वर्षी म्हणजे साल 2026 च्या सुरुवातीला ग्रहांचा सेनापती मंगळ आणि व्यापाराचा दाता बुध यांची युती मकर राशीत होणार आहे. या युतीमुळे काही राशींना धन–संपत्तीची प्राप्ती होणार आहे. हा काळ कोणत्या राशींसाठी शुभ ठरू शकणार आहे ते पाहूयात.

कुंभ राशि

मंगळ–बुध युती कुंभ राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकणार आहे. हा संयोग तुमच्या राशीच्या करिअर आणि व्यवसाय भावात होणार आहे. नोकरी आणि व्यवसायात पुढे जाण्याच्या संधी मिळणार आहेत. व्यापाऱ्यांना चांगला धनलाभ होण्याची शक्यता आहे.

तूळ रास (Libra Zodiac)

मंगळ बुध ग्रहाची युती तूळ राशीच्या लोकांसाठीही लाभदायक ठरू शकणार आहे. हा संयोग तुमच्या राशीच्या चतुर्थ भावात होत असल्याने सुख–सोयींमध्ये वाढ होईल. वडिलांच्या संपत्तीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. धनलाभाचे नवे स्रोत उघडणार आहेत. कुटुंबात आनंद आणि सामंजस्य राहणार आहे.

धनु रास (Dhanu Zodiac)

धनु राशीसाठी मंगळ–बुध युती अत्यंत फायदेशीर ठरू शकणार आहेत. हा संयोग तुमच्या राशीच्या वाणी आणि धन भावात होत असल्याने आकस्मिक धनलाभाचे योग तयार होणार आहेत. आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. प्रवास आणि नवे संपर्क लाभदायक ठरणार आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : मोठी बातमी! रॅपिडो बाइक - टॅक्सी सेवा बंद करण्याचे आदेश; वाचा सविस्तर

DoT Telecom Rules: मोबाईलवर येणाऱ्या इनकमिंग कॉलबाबत नवा नियम; १ नोव्हेंबरपासून काय बदलणार, जाणून घ्या!

Maharashtra News Live Update: MPSC प्रकरणाच्या चौकशी आयोगात माझा सहभाग असल्याबाबत कोणतीही माहिती माझ्याकडे नाही - तुकाराम मुंढे

घर नवऱ्याच्या नावावर, तरीही त्यालाच घराबाहेर काढलं! बायकोने जिंकली केस; कोर्टाचा निर्णय नेमका काय?

MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई, आदर्श शिक्षक पुरस्कार विजेता मयूर ठाकरेला अटक

SCROLL FOR NEXT