प्रसिद्ध गायक जुबीन गर्ग यांचे स्कुबा डायव्हिंगदरम्यान निधन
‘या अली’ गाण्याने त्यांना मिळाली मोठी लोकप्रियता
चाहत्यांमध्ये आणि संगीतसृष्टीत शोककळा पसरली
२०१९ आणि २०२४ मध्ये वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आले होते
प्रसिद्ध गायक जुबीन गर्ग यांचे आज निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. या गायकाच्या निधनानंतर त्यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला असून त्यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. अचानक आलेल्या या दु:खद बातमीवर अनेकांना विश्वास ठेवणं देखील कठीण होत आहे. तसेच अनेकांना या गायकाबद्दल फारशी माहिती नाही.
जुबीन गर्ग हे बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक होते. त्यांनी असमिया, बंगाली आणि हिंदी चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. गर्ग यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षीच गायन सुरू केले होते. त्यांची पहिली गुरु त्यांची आई होती. पहिले गाणे त्यांनी आपल्या आईकडूनच शिकले. तसेच त्यांनी पंडित रॉबिन बॅनर्जी यांच्याकडून सलग अकरा वर्षे तबला वादनाचे शिक्षण घेतले
मीडियाच्या अहवलानुसार जुबीन यांचा स्कूबा डायव्हिंग दरम्यान अपघात झाला. त्यांना बेशुद्ध अवस्थेत हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी जुबीन यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र, यामध्ये डॉक्टरांना यश आले नाही. अखेर जुबीन यांचा मृत्यू झाला. जुबीन गर्ग यांच्या मृत्यूनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
२०१९ मध्ये वादग्रस्त विधान
जुबीन गर्ग हे २०१९ साली एका विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यावेळी जुबीन म्हणाले होते, मी ब्राह्मण आहे, पण मी चित्रपटात माझा (ब्राह्मणांनी धारण केलेला पवित्र धागा) तोडला होता. मी आधीही हा धागा काढून टाकला होता आणि आत्ताही तो घालत नाही. या ब्राह्मणांना मारून टाकलं पाहिजे. या वक्तव्यामुळे मोठा संताप उसळला होता. नंतर जुबीन यांनी विधानाबद्दल सार्वजनिक माफी मागितली होती.
एप्रिल २०२४ मध्ये झालेल्या बिहू कॉन्सर्टदरम्यानही जुबीन वादात सापडले होते. त्यावेळी त्यांनी जमावाला उद्देशून म्हटले “कृष्ण कधीही देव नव्हते, ते आपल्या सारखेच सामान्य माणूस होते” असे विधान केले होते. या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आणि त्यानंतर माजुली जिल्हा सत्र महासभेने त्यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.