Bhaskar Jadhav Targets Brahmin Community
Bhaskar Jadhav’s statement once again triggers Brahmin vs Maratha political row in Maharashtrasaam tv

Bhaskar Jadhav: ब्राह्मणविरुद्ध मराठा वादाची ठिणगी; भास्कर जाधवांनी पुन्हा ब्राह्मण समाजाला डिवचलं

Bhaskar Jadhav Targets Brahmin Community: भास्कर जाधवांच्या खोतकीसंदर्भातील विधानानं ब्राह्मण समाज आक्रमक झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा जाधवांनी ब्राह्मण समाजाला डिवचलयं.. नेमकं जाधव काय म्हणाले? आता ब्राह्मण विरुद्ध मराठा हा वाद नेमका का पेटलाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Published on
Summary
  • भास्कर जाधवांनी पुन्हा ब्राह्मण समाजाला लक्ष्य केलं

  • खोतकी प्रकरणानंतर वाद पुन्हा पेटला

  • ब्राह्मण समाजाकडून तीव्र प्रतिक्रिया

  • महाराष्ट्रात जातीय तणाव वाढण्याची शक्यता

ठाकरेसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्या व्हॉट्सअॅप स्टेट्सनंतर पुन्हा एकदा ब्राह्मण विरुद्ध मराठा वादाची ठिणगी पडलीय. जाधवांनी याआधी खोतकीसंदर्भात केलेल्या विधानामुळे ब्राह्मण समाज आणि जाधव यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे. अशातच पुन्हा एकदा जाधवांनी डिवचणारं स्टेट्स ठेवल्यानं ब्राह्मण समाजही आक्रमक झालाय.

जाधवांच्या कोणत्या विधानांमुळे ब्राह्मण विरुद्ध मराठा या वादाची ठिणगी पडलीय ? पाहूयात. जाधवांच्या विधानानंतर ब्राह्मण समाजानं घेतलेली भूमिका आणि त्यानंतर ब्राह्मण विरुद्ध मराठा असा पेटलेला वाद आता दिवसेंदिवस चिघळत चाललाय. त्यामुळे गुहागरमध्ये भास्कर जाधव आणि ब्राह्मण समाजात रंगलेला हा कलगीतुरा नेमका कधी थांबणार? कोकणातील मराठी विरुद्ध ब्राह्मण या वादामागे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कारणीभूत आहेत का? असाही प्रश्न निर्माण झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com